Ayodhya Election 2024 Winner: अयोध्येत भाजपचा पराभव, लल्लूंना धूळ चारली; समाजवादी पक्षाला विजयाचा 'प्रसाद'

Avdhoot Prasad Won From Ayodhya Lok Sabha Constituency: उत्तर प्रदेशच्या अयोध्येत भाजपला मोठा धक्का बसला आहे. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला आहे.
Ayodhya Election 2024 Result: अयोध्येत भाजपचा पराभव, लल्लूंना धूळ चारली; समाजवादी पक्षाला विजयाचा 'प्रसाद'
Ayodhya Lok Sabha Election Result 2024Saam TV
Published On

उत्तर प्रदेशच्या अयोध्येत भाजपला मोठा धक्का बसला आहे. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी त्यांचा दारुण पराभव केला आहे. फैजाबाद लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान झाले होते. जागेसाठी २० मे रोजी मतदान झाले होते. या जागेवरून लल्लू सिंह हेच विजयी होतील, असा अंदाज वर्तवला होता.

Ayodhya Election 2024 Result: अयोध्येत भाजपचा पराभव, लल्लूंना धूळ चारली; समाजवादी पक्षाला विजयाचा 'प्रसाद'
Navneet Rana Defeat: सर्वात मोठी बातमी! अमरावतीतून नवनीत राणांचा पराभव, काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी

मात्र, समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधूत प्रसाद यांनी अटीतटीच्या लढतीत लल्लू सिंह यांचा पराभव केला आहे. आज मतमोजणीला सुरुवात होताच अवधूत यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. ही आघाडी तोडण्याचा लल्लू सिंह यांनी मोठा प्रयत्न केला. मात्र, त्यांना शेवटपर्यंत यश मिळालं नाही.

अखेर लल्लू सिंह यांचा निवडणुकीत सुमारे 45 हजार मतांनी पराभव झाला. हा भाजपलेला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे. कारण, राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. फैजाबाद लोकसभा जागेवर 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे तर येथे भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांनी 65 हजारांहून अधिक मतांनी सपाचे आनंद सेन यादव यांचा पराभव केला होता.

लल्लू यादव यांना 5 लाख 29 हजार 21 तर आनंद सेन यादव यांना 4 लाख 63 हजार 544 मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. लल्लू सिंह यांना 357414 मते मिळाली आहेत. तर अवधेश प्रसाद यांना 382267 मते मिळाली आहेत. भाजपा आणि सपा मधील उमेदवाराचे मतांचे अंतर ४५ हजार पेक्षा जास्त मतांचे झाले आहे.

अमेठीतून स्मृती इराणी यांचा पराभव

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा पराभव केला आहे. इराणी यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसने यावेळी आपली रणनीती बदलली. 

Ayodhya Election 2024 Result: अयोध्येत भाजपचा पराभव, लल्लूंना धूळ चारली; समाजवादी पक्षाला विजयाचा 'प्रसाद'
Baramati Loksabha Election Result: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजयी, सुनेत्रा पवार यांचा पराभव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com