Ajit Pawar On Free Electricity:
मोदी यांचं तिसऱ्यांदा सरकार आलं, तर मोफत 300 युनिट वीज मिळणार, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. आज धाराशिवाय येथे प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.
ते म्हणाले आहेत की, गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा शेतकऱ्यांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. निवडणूक त्या मुद्द्यावर जिंकली आणि पाहिलं बिल दिलं शून्याचे. मात्र नंतर पुन्हा आधी सारखे बिल देण्यास सुरुवात झाली. म्हणाले परवडत नाही. मात्र मोदी हे कुठलंही काम करतात, ते मागील पुढील विचार करून करतात.
अजित पवार म्हणाले, ''राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा नरेंद्र मोदी येतात, त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही चर्चा करतो. आता 300 युनिटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांना येथून पुढे मोदींच तिसऱ्यांदा सरकार आल्यावर 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.''
अजित पवार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. विकासाकरिता आम्ही महायुती मधून लढतोय. विकासाकरिता आम्हाला राज्याचा देखील भलं करून घ्यायचं आहे. केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला या कामासाठी लागणार आहे. मोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्राची मदत लागते. 24 तास पैकी 18 तास नरेंद्र मोदी काम करतात. सतत काम काम काम करतात.
याआधी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ''मी यापूर्वी अनेकदा आलो. पण धाराशिवमध्ये माझ्या सासरवाडीत एवढी मोठी गर्दी पहील्यांदा बघितली. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदींनी या देशाच नेतृत्व केलं. 3 कोटी घर देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हे सरकार तुमच आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुख माहीती आहे. 1 रुपयात पिकविम्याचा निर्णय घेतला. ''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.