- मंगेश भांडेकर
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात मतदान कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. सोबतीला जिल्हा पोलिसांचे हेलिकॉप्टर आहे. तब्बल 68 बुथवर 295 कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने मतदान केंद्रावर सोडले जात आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
गडचिरोली जिल्ह्यात येत्या 19 एप्रिलला लाेकसभा निवडणुकीसाठी मतदान घेतले जाणार आहे. निवडणुक आयाेग लाेकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी जास्ती जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्नशिल आहे.
गडचिराेली चिमूर लाेकसभा मतदारसंघात (gadchiroli chimur lok sabha election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदान हाेणार असून नक्षलवाद्यांच्या सावटाखाली ही निवडणूक शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान जिल्हा पोलिसांसमोर आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गडचिरोलीत तब्बल वीस हजार पोलिसांचा बंदोबस्त निवडणुकीदरम्यान राहणारा आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पोलिसांसह आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील पोलिस तसेच सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.
आज भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या (3 MI 17) आणि (4 ALH) हेलिकॉप्टरच्या मदतीने अहेरी पोलिस मुख्यालयातून गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांना चॉपरच्या सहाय्याने सोडले जात आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.