Parbhani: परभणी जिल्ह्यातील भूजलपातळी खालावली; मानवत, सेलू, पाथरीत भीषण स्थिती

मानवत, सेलू, पाथरी तालुक्यात सर्वाधिक भूजल पातळीत घट नोंदविली गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ground water level decreased by 2.28 meter in parbhani
ground water level decreased by 2.28 meter in parbhaniSaam Digital

Parbhani :

परभणीकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. मागील वर्षीच्या मान्सूनमध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. परभणी जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी 2.28 मीटरने घटल्याने भविष्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागणार आहे. (Maharashtra News)

परभणी, जिंतूर, गंगाखेड, सेलू, पाथरी, पूर्णा, मानवत, सोनपेठ, पालम या नऊ तालुक्यांत भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 86 विहिरींचे सर्वेक्षण झाले. यात वाढत्या तापमानामुळे आणि पाणी उपसा अधिक होत असल्याने पाणी पातळीवर मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

ground water level decreased by 2.28 meter in parbhani
Satara Constituency : शशिकांत शिंदे यांना रिटर्न गिफ्ट देण्याची नामी संधी चालून आली : नरेंद्र पाटील

मागील पाच वर्षांच्या भूजल पातळीची तुलना केल्यास मार्च 2024 मध्ये ही पाणीपातळी 2.28 मीटरने घटल्याचे समोर आले आहे. यात परभणी तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांत एक मीटर ते 3.96 मीटरपर्यंत खालावल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वाधिक भूजल पातळीत घट ही मानवत, सेलू, पाथरी तालुक्यातील नोंदविली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाढते तापमान, घटती भूजल पातळी येणाऱ्या काळासाठी धोक्याची घंटा असून, उपाय करणे गरजेचे आहे.

Edited By : Siddharth Latkar

ground water level decreased by 2.28 meter in parbhani
PSI Success Story : वडिलांचे कष्ट पाहून 'खुशबू' झाली व्यथित... मार्ग दिसला अन् 'बरैय्या' बनली फाैजदार (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com