Sonia Gandhi On Rahul Gandhi Saam Tv
लोकसभा २०२४

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

Raebareli Lok Sabha: आज माझ्याकडे जे काही आहे ते तुम्ही दिले आहे आणि आज मी माझा मुलगा राहुल गांधी तुम्हाला सोपवत आहे, असं काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

Satish Kengar

Sonia Gandhi On Rahul Gandhi:

आज माझ्याकडे जे काही आहे ते तुम्ही दिले आहे आणि आज मी माझा मुलगा राहुल गांधी तुम्हाला सोपवत आहे, असं काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. आज रायबरेली येथे इंडिया आघाडीची सभा पार पडली. या सभेत सोनिया गांधी राहुल गांधी यांचा प्रचार करताना भाविक झाल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी त्या असं म्हणाल्या आहेत.

त्या म्हणाल्या की, अमेठी-रायबरेलीशी आमचे नाते शेतकरी आंदोलनाच्या काळापासून सुरू झालं आणि आता मी माझा राहुल तुम्हाला सोपवत आहे. यावेळी सोनिया गांधी यांचा भाषण सुरु असताना त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रिया गांधी हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, ''तुमच्या (रायबरेली येथील नागरिकांनी) प्रेमाने मला कधीच एकटे वाटू दिले नाही. आमच्या कुटुंबाच्या आठवणी रायबरेलीशी जोडलेल्या आहेत. आज खूप दिवसांनी मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. मी मनापासून तुमची ऋणी आहे.''

राहुल गांधी तुम्हाला कधीही निराश करणार नाहीत

सोनिया गांधी म्हणाल्या, ''तुम्ही मला 20 वर्षे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. रायबरेली हे माझे कुटुंब आहे, त्याचप्रमाणे अमेठीही माझे घर आहे. या जागेशी माझ्या आयुष्यातील गोड आठवणीच जोडलेल्या नाहीत, तर गेल्या 100 वर्षांपासून आमच्या कुटुंबाची मुळे या मातीशी जोडलेली आहेत. राहुल गांधी तुम्हाला कधीही निराश करणार नाहीत.''

अवध आणि रायबरेलीच्या शेतकरी आंदोलनापासून गंगेसारखे पवित्र असलेले हे नाते आजतागायत तसेच असल्याचं त्या म्हणाल्या. सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, मी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना तेच शिक्षण दिले आहे जे इंदिराजींनी मला दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

SCROLL FOR NEXT