प्रमोद जगताप
हैदराबाद: सकाळी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या काही महिलांचा बुरखा उघडून त्यांची ओळख माधवी लता यांनी तपासली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यांच्याविरोधात मलकपेटमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
मतदार महिलांची ओळख तपासून घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मलकपेटमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथ्या टप्पा आज पार पडत आहे. या टप्प्यात हैदराबाद येथे मतदान प्रक्रिया पार पडत असून येथील भाजप उमेदवार माधवी लता ह्या वादात सापडल्यात. माधवी ह्यांना पोलीस चौकशीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
माधवी लता यांनी मतदान करण्यासाठी आलेल्या मतदान केंद्रावर आलेल्या मुस्लीम महिलांनी बुरखा परिधान केला होता. त्यावेळी उमेदवार माधवी लता यांनी त्यांनी महिला मतदारांना त्यांचा चेहरा दाखवण्यास सांगितलं. ज्यातून त्या महिला मतदारांच्या फोटोच्या मदतीने त्यांची ओळख पटवू शकतील. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर माधवी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.
माधवी लता या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या उमेदवारांपैकी एक आहेत. माधवी लता यांची हैदराबादचे चारवेळा खासदार राहिलेले आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी लढत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी रोनाल्ड रॉस यांनी माध्यमांना सांगितले की, पोलीस माधवी लताविरुद्ध एफआयआर दाखल करतील कारण कोणत्याही उमेदवाराला मतदारांची ओळख तपासण्यासाठी कोणाचा बुरखा उचलण्याचा अधिकार नाही. जर मतदारांविषयी शंका असेल तर उमेदवार मतदान अधिकाऱ्याला मतदाराची ओळख तपासण्यास सांगू शकतात.
दरम्यान भाजप उमेदवार माधवी लता यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, मी एक उमेदवार आहे. कायद्यानुसार एक उमेदवाराला मतदारांची ओळख पटवण्याचा अधिकार आहे. फेसमास्क आणि ओळख तपासण्याचा अधिकार मला आहे. ''मी पुरुष नाही, मी एक स्त्री आहे आणि अत्यंत नम्रतेने मी त्यांना विनंती केली. जर एखाद्याला मोठा विरोध करायचा असेल तर ते घाबरलेत.” दरम्यान ओवेसी यांनी याप्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
परंतु व्हायरल झालेला व्हिडिओ त्यांनी आपल्या एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलाय. दरम्यान भाजप उमेदवार माधवी लता यांनी आरोप केलाय की, मतदारांच्या यादीत गडबड झालीय. मात्र पोलीस कर्मचारी सुस्त दिसत आहेत. ते कोणताच तपास करत नाहीयेत. "जेष्ठ नागरिक मतदार येथे येत आहेत, परंतु त्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आल्या आरोप माधवी लता यांनी केलेत."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.