Prashant Kishor Saam Tv
लोकसभा २०२४

Prashant Kishor : भाजप किती जागा जिंकणार? प्रशांत किशोर यांनी केली मोठी भविष्यवाणी, आकडेवारीचा अंदाज सांगितला!

Lok Sabha Election 2024: देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोण जिंकणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच आता कोणाला किती जागा मिळू शकतात, याबाबत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

Satish Kengar

देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोण जिंकणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच आता कोणाला किती जागा मिळू शकतात, याबाबत राजकीय रणनीतीज्ञ प्रशांत किशोर यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

प्रशांत किशोर यांच्या भाकितामुळे इंडिया आघाडीचं टेन्शन वाढू शकतं, तर भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटू शकतात. प्रशांत किशोर म्हणाले आहेत की, केंद्रातील राजकारणात हॅट्ट्रिक करू पाहणाऱ्या भाजप सरकारबाबत लोकांमध्ये कोणताही मोठा असंतोष किंवा अन्य पर्यायाची मागणी होताना दिसली नाही.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आणखी एक विजय मिळवून देऊ शकतात. पक्षाच्या जागांची संख्या 2019 च्या 303 जागांच्या जवळपास किंवा त्याहूनही जास्त असू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, “मला वाटते मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप पुनरागमन करत आहे. त्यांना गेल्या निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या असतील तितक्याच जागा मिळू शकतात किंवा त्यांची कामगिरी पूर्वीपेक्षा थोडी चांगली असू शकते.

प्रशांत किशोर म्हणाले, "आपल्याला मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. सध्याचे सरकार आणि त्यांच्या नेत्याच्या विरोधात राग असला तरी पर्याय नसल्यामुळे लोक त्यांना मत देण्याचा निर्णय घेतील, अशी शक्यता आहे.''

ते पुढे म्हणाले की, ''2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल बघितले तर राजकीय तज्ज्ञांनी भाजपला 272 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे भाकीत केले होते. यावेळी भाकीत भाजपच्या बाजूने आहे. 272 जागांवरून 370 पर्यंत त्यांचे लक्ष्य आहे. त्यांच्या रणनीतीमुळेच बहुतांश तज्ज्ञ भाजपच्या विजयाचे भाकीत करत आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

SCROLL FOR NEXT