Maharashtra Politics: उद्धव ठाकरे लंडनला पळून जाणार; नितेश राणेंचा खळबळजनक दावा, सचिन अहिर यांनीही दिली तिखट प्रतिक्रिया

Nitesh Rane On Uddhav Thackeray: भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरे कुटुंबियांसह लंडनला पळून जाणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
Saam Tv
Nitesh Rane On Uddhav ThackeraySaam Tv

भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरे कुटुंबियांसह लंडनला पळून जाणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करून पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूकआउट नोटीस काढावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

यावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनीही आपली प्रतिक्रिया देत नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कोण जाणार कोण राहणार हे 4 जूनला लोकच ठरवणार, असा पलटवार सचिन अहिर यांनी केला आहे.

Saam Tv
Mumbai Voting Percentage: मतदानाची टक्केवारी कमी का झाली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली गंभीर दखल; तात्काळ चौकशीचे आदेश

काय म्हणाले नितेश राणे?

उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत नितेश राणे म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि कुटुंबीयांचं पासपोर्ट जप्त करून घ्यावं. कारण 4 जूनला त्यांचा पराभव होणार आहे, हे आता सिद्ध झालं आहे.''

ते म्हणाले, ''माझ्या माहितीनुसार ठाकरे कुटुंबीय लंडनला पळून जाण्याच्या तयारीत आहेत. म्हणून लवकरच लवकर पोलिसांनी त्यांच्या नावाने लूकआऊट नोटीस काढावी. त्याचसोबत त्यांचे पासपोर्टही जप्त करावे, अशी मागणी मी करत आहे.''

Saam Tv
Sanjay Raut: 'जिथे महाविकास आघाडीची सरशी, तिथेच संथ गतीने काम', संजय राऊतांना वेगळीच शंका; निवडणूक आयोगावर निशाणा!

सचिन अहिर यांनी दिलं प्रत्युत्तर

नितेश राणे यांच्या आरोपावर आपली प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर म्हणाले की, ''यात एक गोष्ट चांगली आहे, ते आमच्या नेत्यांचा चेहरा बघायला तरी लागले आहेत. आता काहींना तर काहींचे चेहरेच पाहता येत नाही आहे, अशी परिस्थिती झाली आहे.''

ते म्हणाले, ''ही लोकशाही आहे, कोणी व्यक्तीने ठरवून हे होत नाही. 4 जूननंतर कोण जातो, कोण राहातो, हे कळेल. मात्र लोक ठरवतील खरा कौल त्यांचा कोणाच्या मागे आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com