Uddhav Thackeray Criticized Pm Modi
Uddhav Thackeray Criticized Pm Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray On Pm Modi: तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कळलं कधी?, उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Priya More

'मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचे महत्व कळलं कधी?' असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. पीएम मोदींच्या (PM Narendra Modi) मंगळसूत्रावरील वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) आणि राज्यातील महायुतीच्या सरकारसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

हिंगोली येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदींवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'मोदी बोलतात कशावर तर कोण काय खाते यावर. कोण मास खातंय, कोण मच्छी खातंय, त्यांची मुलं. कोणाला किती मुलं होणार त्यांना हे काँग्रेसवाले संपत्ती वाटणार. तुम्हाला कसं कळलं कोणाला किती मुलं होतात. खास करून ते महिलांना सांगतात तुमचा दागिना तुमचे मंगळसूत्र हे त्यांना देऊन टाकतील. मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचे महत्व कळलं कधी गेल्या १० वर्षांत?', असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

तसंच, 'मंगळसूत्र मुसलमानांना देऊन टाकतील असे ते म्हणाले. जास्त मुलं होतील त्यांना देऊन टाकतील. हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा माझ्या शेतकऱ्याला विचारा त्यांच्या मुलांची लग्न, त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र तो विकत घेऊ शकत नाही. कर्जापायी तो बेजार झाला आहे. त्याच्या घरात मंगळसूत्र येत नाही. असलेले मंगळसूत्र गहाण टाकावे लागते. त्यांच्यासाठी गेली १० वर्षे तुम्ही दिलंत काय? याचा हिशोब आधी द्या.', असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मोदींना केले आहे.

रविवारी राजस्थानमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 'काँग्रेसचे सरकार आल्यास मालमत्तेचे सर्वेक्षण केले जाईल. आमच्या बहिणींकडे किती सोनं-चांदी आहे हे तपासले जाईल आणि मग ते सर्वांमध्ये समान वाटले जाईल. माझ्या माता-भगिनींच्या आयुष्यात सोनं हे दाखवण्यासाठी नसून त्यांच्या स्वाभिमानाशी निगडीत आहे. तिचे मंगळसूत्र हे सोन्याच्या किमतीचा मुद्दा नाही. तो तिच्या आयुष्यातील स्वप्नांशी निगडित आहे. काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात ते हिसकावण्याचे बोलत आहेत.' तसंच, मोदी पुढे म्हणाले होते की,'काँग्रेस म्हणते की देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे. अशा स्थितीत ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना वाटण्याचे काम काँग्रेस करेल.' पीएम मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

Raw Banana Benefits: हिरवीगार कच्ची केळी खाण्याचे फायदे माहित आहेत का?

Today's Marathi News Live: शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, रावसाहेब दानवेंचं विधान

SCROLL FOR NEXT