Bacchu Kadu Rally: नवनीत राणांविरोधात बच्चू कडू मैदानात, अमरावतीमध्ये दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ जोरदार शक्तीप्रदर्शन

Amravati Loksabha Election 2024: बच्चू कडू यांच्यासह प्रहार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. या पदयात्रेच्या माध्यमातून बच्चू कडू जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. भर उन्हामध्ये देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे.
Bacchu Kadu Rally
Bacchu Kadu RallySaam Tv

अमर घटारे, अमरावती

अमरावती लोकसभा मतदार संघातील (Amravati Loksabha Election 2024) प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब (Dinesh Bub) यांच्या प्रचारासाठी प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू मैदानात उतरले आहेत. अमरावतीमध्ये प्रहारच्या जन आंदोलन पदायात्रेला सुरुवात झाली आहे. बच्चू कडू यांच्यासह प्रहार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. या पदयात्रेच्या माध्यमातून बच्चू कडू जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. भर उन्हामध्ये देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे.

बच्चू कडू यांनी सभेसाठी सायन्स कोर मैदान बुक केले होते. मैदान बुक करण्यासाठी पैसे भरून संपूर्ण प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती. पण अचानक बच्चू कडू यांना हे मैदान प्रशासनाकडून नाकारण्यात आले. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा अमरावतीमध्ये आज येणार असून याच मैदानात त्यांची सभा होणार आहे. अमित शहा यांच्या सभेसाठी आम्हाला परवानगी नाकारली असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. तसंच त्यांनी मंगळवारी या मैदानाच्या गेटवर कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मांडला होता. मैदानाची परवानगी नाकारल्यामुळे कोर्टात जाणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. अशामध्ये आज बच्चू कडू यांनी हजारो कार्यकर्त्यांसह अमरावतीमध्ये दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ शक्तीप्रदर्शन केले आहे.

Bacchu Kadu Rally
Devendra Fadnavis : इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, ते हलतही नाही, चालतही नाही; देवेंद्र फडणवीसांची टीकेची 'बुलेट ट्रेन' सुस्साट

जिल्हा स्टेडियमवरून बच्चू कडू यांच्या प्रचाररॅलीला सुरूवात झाली आहे. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी ही महारॅली काढली आहे. चित्रा चौक मार्गे ही रॅली जात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नेहरू मैदान येथे रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर बच्चू कडू यांची अमरावतीमध्ये सभा देखील होणार आहे. या सभेमध्ये ते नेमकं काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या महारॅलीनंतर बच्चू कडू जिल्हा प्रशासनाविरोधात गनिमीकाव्याने आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशामध्ये बच्चू कडू यांच्या प्रचाररॅलीमुळे जिल्हा स्टेडीयमवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Bacchu Kadu Rally
Nashik Loksabha Election 2024: नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेच उमेदवार; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजय बोरस्तेंचा दावा

दरम्यान, अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे. अमरावतीत आज अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा होणार असून ते शक्तीप्रदर्शन करणार आहे. आज अमरावती जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बच्चू कडू यांच्या सभा होणार आहे. परतवाडा येथे मविआचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा होणार आहे. सायन्स कोर मैदानात नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. तर बच्चू कडू यांची प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Bacchu Kadu Rally
Narendra Modi: काँग्रेसला संविधानाची पर्वा नव्हती, त्यांनी राज्यघटनेशी खेळ केला; PM मोदींचा हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com