Devendra Fadnavis : इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, ते हलतही नाही, चालतही नाही; देवेंद्र फडणवीसांची टीकेची 'बुलेट ट्रेन' सुस्साट

Devendra Fadnavis latest News : ' इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, ते हलतही नाही, चालतही नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
Devendra Fadnavis :  इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, ते हलतही नाही, चालतही नाही; देवेंद्र फडणवीसांची टीकेची 'बुलेट ट्रेन' सुस्साट
Devendra FadnavisSaam Tv
Published On

चेतन व्यास, वर्धा

वर्धा : राज्यासहित वर्ध्यातही लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. वर्ध्यात भाजपकडून रामदास तडस हे लोकसभेच्या रिंगणात उभे राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बुधवारी वर्ध्यातील पुलगावात रामदास तडस यांच्या प्रचारार्थ महायुतीने जाहीर सभेचं आयोजन केलंय. या जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ' इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, ते हलतही नाही, चालतही नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

>> ही निवडणूक ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि विधानसभेची निवडणूक नाही. ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे.

>> आज देशात दोनच पर्याय आहे. एक पर्याय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वात महायुती आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आहे. त्यांच्या नेतृत्वात २६ पक्षाची खिचडी आहे.

>> राहुल गांधींची खिचडी आहे, त्यात डब्बे नाही फक्त इंजिन आहे. त्यात राहुल गांधी, शरद पवार, ममता यांच्यासह सर्व म्हणतात, मी इंजिन आहे. मग इंजिनमध्ये बसायला जागा नाही.

Devendra Fadnavis :  इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, ते हलतही नाही, चालतही नाही; देवेंद्र फडणवीसांची टीकेची 'बुलेट ट्रेन' सुस्साट
Nashik Loksabha Election 2024: नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेच उमेदवार; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजय बोरस्तेंचा दावा

>> राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी. तर शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे यांना जागा तर उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा आहे. यांचं इंजिन हलत नाही आणि चालत नाही.

>> दहा वर्षात मोदींनी 20 कोटी लोकांना काच्या घरातून पक्या घरात आणलं, यासंह विविध काम केली.

>> 2026 नंतर महिलांना मोठा वाटा मिळणार. मोदी महिलांचं राज्य आणणार आहे.

Devendra Fadnavis :  इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, ते हलतही नाही, चालतही नाही; देवेंद्र फडणवीसांची टीकेची 'बुलेट ट्रेन' सुस्साट
Ajit Pawar Speech : 'तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर...'; अजित पवार स्पष्टच बोलले

>> 4000 हजार कोटींची कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत मदत करू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com