Jayant Patil News  Saam TV
लोकसभा २०२४

Jayant Patil News: घासून-पुसून काम करा; तुमचे संबंध इलेक्शननंतर... जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम!

Maharashtra Loksabha Election: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हातकणंगले मतदार संघात प्रचार करताना त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे आवाहन करतानाच सज्जड दमही भरला आहे

विजय पाटील

Jayant Patil Speech:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हातकणंगले मतदार संघात प्रचार करताना त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे आवाहन करतानाच सज्जड दमही भरला आहे. (Maharashtra loksabha Election 2024)

नेमकं काय म्हणालेत जयंत पाटील?

"आपल्या सर्वांना पाठीमागच्या विधानसभेत तुमच्या बुथवर किती मतदान झाले, कोणती मते कुठे गेली. कोणाला किती मते पडली, याचा अभ्यास करा. आपला नवा उमेदवार मशाल चिन्हावर ठाकरे गटाच्या वतीने महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) उमेदवार म्हणून समोर आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे सर्वांनी घासून-पुसून काम करायचं," असे आवाहन यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

तसेच "कोणाच्या घरी कोणी चहा पिऊन गेले, असले प्रकार मला मला चालणार नाहीत. ते आले, घरात बसले, आम्ही काय करू, असला धंदा बंद करा. अचानक कोणी घरी आले तर तुम्ही घरी जाऊ नका, घराबाहेर जावा. सध्या इलेक्शन सुरू आहे. त्यामुळे तुमचे कोण, काय संबंध असतील, ते इलेक्शन नंतर. ही विधानसभेच्या आधीची रंगीत तालीम आहे. बुथचे नियोजन करा," असा सज्जड दमही जयंत पाटील यांनी दिला.

साताऱ्यात शशिकांत शिंदेंचे जंगी स्वागत...

दरम्यान, सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे हे आज साताऱ्यामध्ये दाखल झालेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचे सातारा- पुणे महामार्गावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे महामार्गावर काही काळ वाहतुक कोंडीही झाल्याचे पाहायला मिळाले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या वडिलांचा नवा कारनामा, अपहरण नाट्यावरचा पडदा अखेर उघडला

Blouse Designs: जरीच्या साड्यांवर ब्लाउस शिवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या

Indian Currency: भारतीय नोटांच्या मागील बाजूस कोणकोणत्या भाषांचा वापर करण्यात आला आहे? वाचा सविस्तर

Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्यांवर बलूच आर्मीकडून मोठा हल्ला, मेजरसह ४ जवानांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: सारथी विद्यार्थ्यांनी घेतली विखे पाटील यांची भेट

SCROLL FOR NEXT