Amit Shah Criticized On Congress Yandex
लोकसभा २०२४

Amit Shah Criticized On Congress: ओबीसींच्या आरक्षणात कॉंग्रेसची बाधा; अमित शहांचा गंभीर आरोप

Guwahati Lok Sabha Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज आसाममध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. आरक्षण संपवण्याची विरोधकांची चर्चा निराधार असल्याचं अमित शहांनी म्हटलं आहे.

Rohini Gudaghe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज आसाममध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शहांनी विरोधकांच्या दाव्यांना खोडून काढलं आहे. आरक्षण संपवण्याची विरोधकांची चर्चा निराधार असल्याचं अमित शहांनी (Amit Shah Criticized On Congress) म्हटलं आहे.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, काँग्रेसला खोटेपणा पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे. भाजप हा एससी/एसटी, ओबीसी आरक्षणाचा समर्थक असल्याचं यावेळी अमित शाहंनी स्पष्ट केलंय. एससी/एसटी ओबीसींच्या आरक्षणात कोणत्याही राजकीय पक्षाने बाधा आणली असेल, तर ती काँग्रेस पक्षाने आणली आहे, असा गंभीर आरोप देखील त्यांनी (Amit Shah Press Conference) केला आहे.

सर्वप्रथम कॉंग्रेसने आंध्र प्रदेशात मुस्लिमांना आरक्षण दिलं. त्यामुळे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) कमी झाले. त्यानंतर कर्नाटकमध्ये देखील कोणतेही सर्वेक्षण किंवा मागासलेपणाचा निर्धार न करता सर्व मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात टाकलं. त्यांच्यासाठी ४ टक्के कोटा राखून ठेवला, त्यामुळे मागासवर्गीयांचे आरक्षणही कमी झाल्याचं अमित शाहंनी (BJP Amit Shah) म्हटलं आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह म्हणाले की, लोकसभा निवडणुक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. आता ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार (Guwahati Lok Sabha Election 2024) आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दोन टप्प्यातील निवडणुकांनंतर पक्षाच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मिळून शंभरचा टप्पा ओलांडला आहे. जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने चारशे पार करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अमित शाह पुढे म्हणाले की, आम्हाला आसाम, बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि उत्तराखंड या सर्व राज्यांतील निवडणुकीत प्रचंड यश मिळत आहे. भाजपला दक्षिण भारतात (Lok Sabha Election 2024) देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, काही दिवसांपासून काँग्रेसने चारशे पार करण्याचं टार्गेटचा अपप्रचार करायला सुरुवात केलीय.

चारशे पार केल्यानंतर भाजप संविधान बदलेल. आरक्षण संपवेल, असा अपप्रचार कॉंग्रेस करत असल्याचा आरोप अमित शाहंनी केलाय.या दोन्ही गोष्टी निराधार आणि तथ्यहीन असल्याचं त्यांनी म्हटल्याची माहिती न्युज १८ हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत (Politics News) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT