Kalyan Lok Sabha Saam Tv
लोकसभा २०२४

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या, अन्यथा काम करणार नाही; BJP कार्यकर्त्यांचा इशारा

Kalyan News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर बालेकिल्लातील ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा स्वतःकडे राखण्याचं आव्हान आता उभं ठाकलय. एकीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Lok Sabha News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर बालेकिल्लातील ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा स्वतःकडे राखण्याचं आव्हान आता उभं ठाकलय. एकीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी  कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी केली.

इतकेच नव्हे तर हा कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला नाही, तर कल्याण पूर्वेत भाजप कार्यकर्ता पदाधिकारी काम करणार नसल्याचा इशारा देखील बैठक घेऊन देण्यात आलाय. या बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या साह्यांच्या मागणीचे निवेदन प्रदेशात अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देणार असल्याचे देखील सांगण्यात आले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असली तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यातच आता या मतदारसंघावर भाजपने दावा केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तर याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठकीत होतो.  (Latest Marathi News)

कल्याण पूर्वेत कोणती बैठक झाली, कोणी घेतली याबाबत काही कल्पना नाही, माहिती घेतो, असे सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुती जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड बहुमताने निवडून येईल. आमदार गणपत गायकवाड यांच्यापाठी कल्याण पूर्व येथीलच भाजप कार्यकर्ते पदाधिकारी नव्हे तर संपूर्ण भाजप ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

SCROLL FOR NEXT