Vasant More Joins Vanchit Bahujan Aghadi Party
Vasant More Joins Vanchit Bahujan Aghadi PartySaam Tv

Vasant More: वसंत मोरे यांचा वंचितमध्ये प्रवेश, पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात लोकसभा लढवणार

Lok Sabha election 2024: अकोल्यातल्या कृषीनगर भागातल्या प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन निवासस्थानी वसंत मोरेंनी वंचितमध्ये प्रवेश केलाय.

>> अक्षय गवळी

Vasant More Joins Vanchit Bahujan Aghadi Party:

अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. वंचितकडून पुण्यातील उमेदवारी जाहिर झाल्यानंतर वंसत मोरे हे आता अकोल्यात दाखल झाले आहे. अकोल्यातल्या कृषीनगर भागातल्या प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन निवासस्थानी वसंत मोरेंनी वंचितमध्ये प्रवेश केलाय. आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी आज वंचित झेंडा हाती घेतला. याशिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय.

दरम्यान, मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून पुण्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची देखील भेट घेतली होती.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vasant More Joins Vanchit Bahujan Aghadi Party
Rahul Gandhi: इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? राहुल गांधींनी दिलं उत्तर

मात्र काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि वसंत मोरेंनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यानंतर वंसत मोरे वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली. या चर्चेवर 2 एप्रिलला शिक्कामोर्तब झालाय. वसंत मोरेंना पुण्यातून अधिकृत उमेदवारी वंचितकडून जाहीर झालीय. (Latest Marathi News)

Vasant More Joins Vanchit Bahujan Aghadi Party
Maharashtra Election 2024: सांगलीवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली, संजय राऊतांचा थेट इशारा

विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होऊन दोन दिवसानंतर अकोल्यात ते आज दाखल झाले आहे, आणि वंचितमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी प्रवेश केला आहे. या दरम्यान वसंत मोरे आणि त्यांचा मित्रपरिवार देखील उपस्थित होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com