Bachchu Kadu saam Tv
लोकसभा २०२४

Bachchu Kadu: निवडणूक मुद्द्यांवर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये: बच्चू कडू

Bhiwandi Lok Sabha Constituency: निवडणूक सुरु झाली आणि कापसाचे भाव हजार रुपये कमी झाले, तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट का नाही? कारण त्याच्या डोक्यात निळा, भगवा, हिरवा घातला गेला आहे: बच्चू कडू

साम टिव्ही ब्युरो

Bachchu Kadu News:

>> अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

निवडणुकीच्या रणधुमाळीत एक हजार रुपये कापसाचा भाव कमी झाला, तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट नाही, याबाबत मला आश्चर्य वाटलं. निवडणूक सुरु झाली आणि कापसाचे भाव हजार रुपये कमी झाले, तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट का नाही? कारण त्याच्या डोक्यात निळा, भगवा, हिरवा घातला गेला आहे. निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे धर्म आणि जातीवर होता कामा नये, असं प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. आज कल्याणमध्ये भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

आमदार बच्चू कडू यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ''34 हजार एकरावर असलेल्या मुंबईमधील सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकांजवळ आहे. या जमिनीला सील का लावला जात नाही. मुंबई झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस पायही पसरू शकत नाही. त्याला राहायला घर नाही. अन्न वस्त्र निवाऱ्यामधील निवारा कुणी हिसकावला, असा सवाल त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, '''जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल , कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील, मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत. धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काचे लढाई थांबता कामा नये. त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबुतीने लढली पाहिजे.

ते म्हणाले, काँग्रेस आणि भाजपा हे दोघं धर्माचे नातेगोते जुळवतात. या भारतात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ज्या आत्महत्या झाल्या, त्या शेतकरी, मजुरांच्या झाल्या. बेरोजगारांनी आत्महत्या केल्यात. तो हिंदू आहे ?का मुसलमान आहे? याचा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतोय, तो कोण हे महत्त्वाचं आहे. हे आमचे नेते लोक सांगत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT