election commission issues notice to pankaja munde and bajrang sonawane Saam Digital
लोकसभा २०२४

Beed Constituency: पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंना नोटीस, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 48 तासांमध्ये मागवला खुलासा; जाणून घ्या कारण

Beed Lok Sabha Election Latest Marathi Update : या दाेन्ही उमेदवारांनी 48 तासांत त्याबाबतचा खूलासा निवडणूक विभागाला द्यावा अशी सूचना करण्यात आली आहे.

विनोद जिरे

बीड लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा जाेरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान या दाेन्ही उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि ठेवलेल्या नाेंदीत तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंडे आणि साेनवणे यांना 48 तासांमध्ये त्यावर खुलासा द्यावा अशी नाेटीस बजावली आहे. (Maharashtra News)

बीड लाेकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी 24 एप्रिल ते 2 मे या कालावधीत सादर केलेल्या एकूण खर्चाची रक्कम 2 लाख 73 हजार 38 रुपये सादर केली आहे.

खर्च निरीक्षक कार्यालयाच्या छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार नोंदविण्यात आलेल्या एकूण खर्च रक्कम 8 लाख 68 हजार 101 एवढा आहे. यामध्ये छायांकित नोंदवहीनुसार झालेल्या खर्चाचा विचार करता मुंडे यांच्याकडून 5 लाख 95 हजार 63 रुपये त्यांच्या खर्चात कमी दर्शविलेल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले.

बजरंग सोनवणे यांनी 22 एप्रिल ते 2 मे पर्यंत सादर केलेल्या एकूण खर्चाची रक्कम 3 लाख 34 हजार 165 आहे. कार्यालयाच्या छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार नोंदविण्यात आलेल्या एकूण खर्चाची रक्कम 8 लाख 84 हजार 459 आहे.

छायांकित नोंदवहीनुसार झालेल्या खर्चाच्या विचार करता उमेदवाराकडून 5 लाख 31 हजार 294 रक्कम त्यांच्या लेखात कमी दर्शविली आहे असे निदर्शनास आले. या दाेन्ही उमेदवारांनी 48 तासांत त्याबाबतचा खूलासा द्यावा अशी सूचना करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT