MLA Kailash Patil Saam Tv
लोकसभा २०२४

MLA Kailash Patil : धाराशिवचे आमदार कैलास पाटील चक्कर येऊन पडले; ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारावेळी उष्माघाताचा त्रास

Kailsah Patil Suffering From Heatstroke: धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये धाराशिवचे आमदार कैलास पाटील सहभागी झाले होते.

Priya More

धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailash Patil) यांना चक्कर आल्याची घटना समोर आली आहे. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या प्रचार रॅलीदरम्यान त्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. घटनास्थळी असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी कैलास पाटील यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका आणि रॅलींचा धडाका सुरू झाला आहे. अशामध्ये मंगळवारी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सहभागी झालेले धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास होऊन ते चक्कर येऊ खाली पडले त्यामुळे रॅलीदरम्यान एकच गोंधळ उडाला.

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ कैलास पाटील यांना कारमध्ये बसवून नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये नेले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील तापमान वाढत चालले आहे. कडक ऊन आणि अति उष्णता यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होताना दिसत आहे. राज्यातील उष्माघाताचे रुग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नका असे आवाहन आरोग्य विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. पण नागरिकांना काही कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. अशामध्ये आता राजकीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरूवात केली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये ही निवडणूक आल्यामुळे उमेदवारांसह राजकीय नेत्यांना भर उन्हात प्रचारसभा आणि रॅली काढाव्या लागत आहेत.

धाराशिवमध्ये सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्याचा त्रास आमदार कैलास पाटील यांना झाला. धाराशिवमध्ये दुपारच्यावेळी भर उन्हामध्ये ओमराजे निंबाळकर यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सहभागी झाले असता आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास होऊन चक्कर आली. अशामध्ये वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT