माढा लोकसभा मतदारसंघात माझ्या कार्यकर्त्यांवर धडपशाही, दादागिरी कराल तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड इशारा इंडिया आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज विराेधकांना दिला. तुमच्या सुख दुःखात मी कायम सोबत राहील असा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील यांनी माण तालुक्यातील जनतेस सभेतून दिला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (dhairyasheel mohite patil) यांच्या प्रचारार्थ आज (शनिवार) ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची आज दहिवडी येथील बाजार पटांगणावर सभा आयाेजिली हाेती. या सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) आणि आमदार जयकुमार गाेरे (jaykumar gore) यांच्यावर टीकेची झाेड उठवली.
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले मी भाजपमधून माढा लोकसभेसाठी उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली होती पण ती पुर्ण झाली नाही. लाेकांची सेवा करण्याची परंपरा आमच्या घराण्याची आहे. ही सेवा करत असताना नेता याेग्य असावा असे माझे ठाम मत झाल्याने मी शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेणारे ज्येष्ठ शरद पवार यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला.
माेहिते पाटील यांनी विविध उदाहरणं देत भाजपने शेतक-यांवर अन्याय केल्याचे म्हटले. कांदा निर्यातीबाबत महाराष्ट्रावर अन्याय झाला. आपला शेतकरी पाकिस्तानमधून आला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशातील युवकांना कृषीमंत्री कोण याविषयी सांगता येत नाही मात्र कृषीमंत्री म्हणुन आजही शरद पवारांचे नाव घेतले जाते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा
भाषणाचा शेवट करताना माेहिते पाटील यांनी या ठिकाणचे दोन नेते आहेत. ते शासकीय यंत्रणांचा वापर करुन आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतात. इथून पुढं आमच्या कार्यकर्त्यावर दडपशाही कराल, दमदाटी कराल तर याद राखा गाठ माझ्याशी आहे असे माेहिते पाटील यांनी विराेधकांना सुनावलं.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.