काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी
PM Modi SAAM TV
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

Satish Kengar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे निवडणूक सभेला संबोधित केले. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित असून यानंतर विरोधी आघाडीतील फूट सुरू होईल, असा दावा त्यांनी केला.

मोदींनी काँग्रेस नेत्यांवर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला. त्यांना अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना द्यायचे आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, ''पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे. 4 जूननंतर विरोधी आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल.''

काँग्रेस हा जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले, 'काँग्रेसला एससी, एसटी आणि ओबीसींचे हक्क हिरावून मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ द्यायचा आहे. काँग्रेसचे नेते 100 टक्के जातीयवादी आहेत. हे काँग्रेसचे सत्य आहे, जे या पक्षाने आणि त्यांच्या परिसंस्थेने वर्षानुवर्षे देशवासीयांना उघड होऊ दिले नाही.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'एकीकडे मनमोहन सिंह म्हणाले होते की, भारताच्या संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे युवराज (राहुल गांधी) काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याचे सांगत आहेत.

मोदी म्हणाले की, मी काँग्रेसच्या युवराजांचा 11-12 वर्षे जुना व्हिडिओ पाहिला आहे. ते म्हणाले, 'मी सोशल मीडियावर काँग्रेसच्या युवराजांचा व्हिडिओ पाहिला. या 11-12 वर्षांच्या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे राजकुमार युवराज सांगत आहेत की, काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : 1 लाख टन कांदा खरेदीचा घोटाळा?; फेडरेशनच्या नावाखाली व्यापारी-अधिकाऱ्यांकडून लूट?

VIDEO: आधी हिजाबबंदी, आता ड्रेसकोडवरून चेंबूरमधील कॉलेजचा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला?

Ambadas Danve LoP: दानवे-लाड वाद पेटला; सभागृहात शिवीगाळ, अंबादास दानवेंचं निलंबन

LIC Scheme: जबरदस्त आहे LIC ची ही योजना, एकदा गुंतवणूक केल्यास आयुष्यभर दरमहा मिळणार 12,000 रुपये पेन्शन

Mumbai Crime : घराच्या मागच्या दरवाजातून शिरून गर्लफ्रेंडसोबत केलं भयानक कांड, गुन्हा कबुल करताच बापाने मुलाला पोलिसांत नेलं

SCROLL FOR NEXT