Mahavikas Aaghadi Jalgaon, Kolhapur Lok Sabha Candidate | Saam Tv Marathi News Saam Tv
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Politics News: शिवसेना ठाकरे गटाने अंतिम चर्चेआधीच १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Gangappa Pujari

विनायक मंजिरे, सिंधुदुर्ग|ता. २९ मार्च २०२४

Nitesh Rane Press Conference:

लोकसभेच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाने अंतिम चर्चेआधीच १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

काय म्हणाले नितेश राणे?

"काल प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलं त्यावरून समजतं की राजकारणातील सूर्याजी पिसाळ हे संजय राऊत आहेत. पहिले उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात वाद लावला. एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या लोकांचाही रोष राऊतांवर होता. त्यानंतर पवार साहेबांच्या घरात वाद लावला. आता काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. त्याला जबाबदार संजय राऊत (Sanjay Raut) आहे," असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

तसेच "अंबादास दानवे हे मूळ संघाच्या विचाराचे आहेत. अशी माहिती आमच्या जवळ आहे. आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक विधानही नितेश राणे यांनी केले आहे. त्याचबरोबर बच्चू कडू नावाचं वादळ आमच्या सागर बंगल्यात शमवल जाईल, असे म्हणत त्यांची नाराजी दूर होईल," असा विश्वासही यावेळी नितेश राणे यांनी व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस- ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. याठिकाणी काँग्रेसकडून विशाल पाटील हे लढण्यास इच्छुक आहेत तर ठाकरे गटाने अंतिम चर्चेआधीच पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT