Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात मातामृत्यूची समस्या गडद; ११ महिन्यात तब्बल ८१५ महिलांनी केला गर्भपात

Nandurbar maternal mortality: योग्य तो पोषण आणि जागृती नसल्याने गेल्या ११ महिन्यात जिल्ह्यात ८१५ महिलांनी गर्भपात करवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nandurbar maternal mortality:
Nandurbar maternal mortality:Saamtv

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. २९ मार्च २०२४

Nandurbar News:

नंदुरबार जिल्ह्यात मातामृत्यूची समस्या दिवसेंदिवस गडद होत आहे. जिल्ह्यामध्ये ११ महिन्यात तब्बल ८१५ महिलांनी गर्भपात करवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांना आरोग्याबाबत जगजागृती करणे गरजेचे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मातामृत्यूची समस्या दिवसेंदिवस गडद होत आहे. यात महिलांच्या आरोग्याविषयीची अनास्था आणखी पुढे येत आहे. या अनास्थेतून योग्य तो पोषण आणि जागृती नसल्याने गेल्या ११ महिन्यात जिल्ह्यात ८१५ महिलांनी गर्भपात करवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या गर्भपाताची कारणे वेगवेगळी असली तरी बहुतांश महिलांना आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने गर्भपातांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात ७ शासकीय तर ३० खासगी दवाखान्यांमध्ये कायदेशीर पद्धतीने गर्भपात करण्यात येतात. २१ आठवड्यांपर्यंतच्या या गर्भपातांसाठी संबधित डॉक्टरांकडून परवानगी घेऊनच पुढील प्रक्रिया होते.

Nandurbar maternal mortality:
SSC Exam : दहावीच्या पेपर दरम्यान परीक्षा केंद्रावर तरुणांचा धुडगूस; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

जिल्ह्यात गेल्या काही काळात १ हजार मुलींमागे ९७८ मुलींचा जन्म होत असल्याने स्त्री- पुरुष लिंगगुणोत्तर हे चांगल्या स्थितीत आहे. परंतु मातांच्या आरोग्याबाबत योग्य ती माहिती दिली जात नसल्याने गर्भधारणेनंतर वाढत जाणाऱ्या अडचणीतून गर्भपात होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे शासनाने गांभीर्याने याची दखल घेऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.

.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar maternal mortality:
Parbhani DCC Bank : काॅंग्रेस आमदार सुरेश वरपूडकरांना धक्का, परभणी जिल्हा बॅंक अध्यक्षपद धाेक्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com