17 Congress Candidates List Declared Saam Tv
लोकसभा २०२४

Congress Candidates List: काँग्रेसने 17 उमेदवारांची यादी केली जाहीर, कोण कोणत्या दिग्गजांना मिळाली संधी, जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 News in Marathi: आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसने 17 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Congress Candidates list:

आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसने 17 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने बिहारच्या कटिहारमधून तारिक अन्वर, किशनगंजमधून मोहम्मद जावेद आणि भागलपूरमधून अजित शर्मा यांना तिकीट दिले आहे. याशिवाय पक्षाने आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांना कडप्पा लोकसभा मतदारसंघातून आणि माजी केंद्रीय मंत्री एमएम पल्लम राजू यांना काकीनाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. (Congress Releases a List of 17 Candidates for The Upcoming Lok Sabha Elections)

पक्षाने आतापर्यंत 230 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. याआधी काँग्रेसने नऊ वेगवेगळ्या यादीत 212 उमेदवार जाहीर केले होते. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या 11व्या यादीत आंध्र प्रदेशातील पाच, बिहारमधील तीन, ओडिशातील आठ आणि पश्चिम बंगालमधील एका जागेचा समावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पक्षाने पुन्हा एकदा अन्वर यांना बिहारमधील कटिहारमधून उमेदवारी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा जनता दल (युनायटेड) उमेदवार दुलालचंद गोस्वामी यांनी पराभव केला होता. पुन्हा एकदा त्यांचा सामना गोस्वामी यांच्याशी होणार आहे. बिहारमधील किशनगंज लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान खासदार मोहम्मद जावेद यांना तिकीट दिले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अजित शर्मा यांना भागलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.   (Latest Marathi News)

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 पैकी नऊ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे. यात मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) 26 जागांवर निवडणूक लढवत आहे आणि डावे पक्ष पाच जागांवर निवडणूक लढवत आहेत. बिहारमध्ये आघाडी अंतर्गत काँग्रेसला किशनगंज, कटिहार, पटना साहिब, भागलपूर, सासाराम, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, पश्चिम चंपारण आणि महाराजगंज या नऊ जागा मिळाल्या आहेत.

याच यादीत माजी मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजू यांना आंध्र प्रदेशातील काकीनाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शर्मिला रेड्डी यांना आंध्र प्रदेशातील कडप्पा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. कोरापुट ओडिशाचे विद्यमान खासदार सप्तगिरी उलाका यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 114 आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठी 49 उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, देशात 18व्या लोकसभेसाठी 19 एप्रिलपासून मतदान सुरू होणार आहे. यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी आणखी सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT