Liquor Scam : मोठी बातमी! मद्य धोरण घोटाळा प्रकरण; 'आप' खासदार संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

MP Sanjay singh latest Update : कोर्टात अटकेवरील याचिकेवर सुनावणी करताना आप खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे. ते मागील सहा महिन्यांपासून अटकेत होते.
sanjay singh
sanjay singhSaam Digital
Published On

MP Sanjay singh grants bail :

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरील आव्हानाच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात झालेल्या या सुनावणीत आप खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे. ते मागील सहा महिन्यांपासून अटकेत होते.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश पीबी वराळे यांच्या खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी केली. 'खासदार संजय सिंह यांना तरुंगात ठेवण्याची गरज काय? असा सवाल या तिन्ही न्यायाधीशांच्या खंडपीठाने ईडीला केला. संजय सिंह यांच्या वकिलांनी म्हटलं की, या मनी लॉड्रिंग प्रकरणाला दुजोरा मिळालेला नाही'.

sanjay singh
Arvind Kejriwal: चौकशीदरम्यान केजरीवाल यांनी आपच्या कोणत्या 2 नेत्यांची घेतली नावे? कोर्टात ईडीने काय केला दावा?

'संजय सिंह यांच्याकडून कोणताही पैसा जप्त नाही'

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक आणि चौकशीला आव्हान देणारी याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 'आप' खासदार संजय सिंह यांच्या वकिलांच्या युक्तिवादावर विधान केलं. खासदार सिंह यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, संजय सिंह यांच्याकडून कोणाताही पैसा जप्त करण्यात आलेला नाही. त्यांच्यावरील दोन कोटी रुपये लाच घेण्याच्या आरोपांची चौकशी करता येईल'.

sanjay singh
PM Modi In Rudrapur : तिसऱ्या कार्यकाळात वीज बिल शून्य, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई : PM मोदी

सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश पीबी वराळे यांच्या खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी केली. 'खासदार संजय सिंह यांना तरुंगात ठेवण्याची गरज काय? असा सवाल या तिन्ही न्यायाधीशांच्या खंडपीठाने ईडीला केला.

दरम्यान, संजय सिंह यांच्यावर २०२१-२२ पॉलिसी पीरियडशी संबंधित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातील फंड जमा केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने विरोध केला नाही.

सुप्रीम कोर्टाने संजय सिंह यांना जामीन का दिला?

सुप्रीम कोर्टाने निर्णयावर भाष्य करताना म्हटलं की, 'संजय सिंह यांना राजकीय कामे सुरु ठेवता येईल'. तत्पूर्वी, 'पीएमएलएच्या ३ आणि ४ कलामाअंतर्गत कारवाई अधिकवेळ सुरु राहणार असल्यामुळे त्यांना जामीन मंजूर केला, असं 'सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com