Maharashtra Politics
Maharashtra Politics  Saam tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics : दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराला काँग्रेसची पाठ; नेत्यांची नाराजी दूर होणार का?

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, मुंबई

मुंबई : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय नेते काही मतदारसंघात एकत्र येऊन उमेदवारांचा प्रचार करत आहेत. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वेगळं चित्र दिसत आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराला काँग्रेसचे नेते पदाधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महाविकास आघाडीकडून दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड या आग्रही होत्या. मात्र, ही जागा ठाकरे गटाकडे गेली. दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला न मिळाल्याने वर्षा गायकवाड या नाराज असल्याचंही सांगण्यात येत होतं.

याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांची भेट घेतली. मात्र, दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला मिळू शकली नाही. ठाकरे गटाला मिळालेल्या जागेत उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या प्रचाराला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

दक्षिण मध्य मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराला काँग्रेसचे नेते पदाधिकारी वारंवार प्रचारासाठी अनुपस्थित राहत असल्याची माहिती हाती आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी ठाकरे गटाकडून दक्षिण मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. उद्या सकाळी 10 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात दक्षिण मध्य मुंबई लोकसभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या या बैठकीत काँग्रेसची नाराजी दूर होणार का, हे पाहावे लागेल. दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही होते. काँग्रेसला जागा मिळाली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याच चित्र होती, ही नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरु असताना अजूनही काँग्रेसचे पदाधिकारी अनिल देसाई यांच्या प्रचाराला पदाधिकारी अनुपस्थित राहत आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय घडतं, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी RSSचा सदस्य, संघटनेसाठी पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक; निवृत्तीच्या भाषणात न्यायाधीश चित्तरंजन दास नेमकं काय म्हणाले?

Today's Marathi News Live : किर्गिस्तानमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

Pune Crime: पुण्यात दिवसाढवळ्या १० वर्षीय मुलीचं अपहरण, शेवटचे CCTV फुटेज आलं समोर

Nagpur RTE News : नागपूरमध्ये शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बोगस कागदपत्र, गुन्हा दाखल

Ginger Side Effects : उन्हाळ्यात अद्रक खाताना १० वेळा विचार करा; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT