Congress Candidates List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी

Lok Sabha Election 2024 News in Marathi: काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत झारखंडमधील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी
Congress Candidates List:Saam TV
Published On

Congress Candidates List:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचार तीव्र केला आहे. दिग्गज नेते आणि पक्षांचे उमेदवार लोकसभा मतदारसंघात फिरून जनतेकडून मते मागत आहेत. दरम्यान, काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत झारखंडमधील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

झारखंडमध्ये काँग्रेसला इंडिया आघाडी अंतर्गत सात जागा मिळाल्या असून त्यापैकी 6 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसने गोड्डामधून दीपिका पांडे सिंग, चतरा येथून केएन त्रिपाठी आणि धनबादमधून अनुपमा सिंग यांना उमेदवारी दिली आहे. याआधी पक्षाने खुंटी, हजारीबाग आणि लोहरदगा मतदारसंघातून उमेदवार उभे केले होते. फक्त एक जागा उरली आहे, रांची, अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी
Maharashtra Politics: महाशक्तीसोबत युती शिंदेना महागात? 6 जागांवर झाली कोंडी? भाजपच्या सर्व्हेचा बसला फटका

दरम्यान, गोड्डा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने निशिकांत दुबे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे उमेदवार निशिकांत दुबे यांच्या विरोधात काँग्रेसने दीपिका पांडे सिंग यांना उमेदवारी दिली आहे. कृष्णा नंद त्रिपाठी हे चतरा जागेवर भाजपचे उमेदवार कालीचरण सिंह यांच्याविरुद्ध लढणार आहेत.

धनबाद जागेबाबत बोलायचे झाले तर अनुपमा सिंह यांचा सामना भाजपचे उमेदवार आमदार धुल्लू महतो यांच्याशी होईल. अनुपमा सिंह या आमदार कुमार जयमंगल सिंह उर्फ ​​अनूप सिंह यांच्या पत्नी आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी
Randeep Surjewala : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाने बजावले समन्स, नेमकं काय आहे प्रकरण?

झारखंडमध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत. सर्व जागांवर चार टप्प्यात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी, पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी, सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी आणि सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. झारखंडमध्ये जेएमएम, काँग्रेस, आरजेडी आणि सीपीआय (ML) इंडिया आघाडीत लोकसभा निवडणूक एकत्र लढत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com