Randeep Surjewala : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाने बजावले समन्स, नेमकं काय आहे प्रकरण?

Haryana Women Commission Notice Randeep Surjewala : मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हरियाणा राज्य महिला आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना समन्स बजावले आहेत.
Randeep Surjewala
Randeep SurjewalaSaam Digital

Congress Leader Randeep Surjewala

मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हरियाणा राज्य महिला आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना समन्स बजावले आहेत. रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्यावर केलेली टिपण्णी निषेधार्ह आहे. एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचेल असं विधान सुरजेवाला यांनी केल्याचं महिला आयोगाने म्हटलं आहे.

हरियाणा राज्य महिला आयोग कायदा, 2012 अंतर्गत सोशल मीडियावरील विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची आयोगाने दखल घेतली आहे. ज्यामध्ये काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं केली आहेत. अशी विधानं महिलांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवणारी आणि असभ्य असल्याचं महिला आयोगाने म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणातील कैथलमधील फरळ गावात एका जाहीर सभेला संबोधित करताना, लोक आम्हाला आमदार आणि खासदार का करतात? हांजीहांजी करायला आम्ही हेमा मालानी नाही, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली. त्यांनंतर सुरजेवाला यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. कोणत्याही अभिनेत्रिचा किंवा राजकीय नेत्याचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.

Randeep Surjewala
Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; लैंगिक शोषण प्रकरणात १८ एप्रिलला न्यायालय देणार निकाल

आक्षेपार्ह वक्तव्याबाबत भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, ते विचारतात की ते आम्हाला आमदार, खासदार का केलं जातं? जेणेकरून ते आवाज उठवू शकतील आणि आमच्या मागण्या मान्य केल्या जातील. मात्र रणदीप सुरजेवाला यांचं हेमा मालिनी यांच्याविषयीचं वक्तव्य अत्यंत घृणास्पद आहे. रणदीप सुरजेवाला यांनी महिलाविरोधी वक्तव्य केले आहे. हे केवळ हेमा मालिनीच नव्हे तर सर्वसामान्य महिलांचाही अनादर करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Randeep Surjewala
Taiwan Earthquake Reason: तैवान, जपानमध्ये नेहमी भूकंप का येतो? उद्ध्वस्त करणारा 'रिंग ऑफ फायर' नेमका काय आहे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com