Maharashtra Politics: महाशक्तीसोबत युती शिंदेना महागात? 6 जागांवर झाली कोंडी? भाजपच्या सर्व्हेचा बसला फटका

Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरीही शिंदे गटाचा जागांसाठीचा संघर्ष थांबलेला नाही. 2019च्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या 6 जागांना भाजपच्या सर्व्हेचं ग्रहण लागलंय.
महाशक्तीसोबत युती शिंदेना महागात? 6 जागांवर झाली कोंडी? भाजपच्या सर्व्हेचा बसला फटका
Eknath ShindeSaam Tv
Published On

Maharashtra Lok Sabha Election:

लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरीही शिंदे गटाचा जागांसाठीचा संघर्ष थांबलेला नाही. 2019च्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या 6 जागांना भाजपच्या सर्व्हेचं ग्रहण लागलंय. शिवसेनेच्या 6 जागांसाठी शिंदे गटाचा संघर्ष सुरु असून भाजपच्या सर्व्हेमुळे या जागांचा तिढा सुटलेला नाही. या 6 जागा कोणत्या आहेत आणि या जागांचा तिढा काय आहे? हे जाणून घेऊ...

शिवसेनेच्या 6 जागांवर भाजपच्या सर्व्हेचं ग्रहण

दक्षिण मुंबईत ठाकरे गटाने अरविंद सावंतांना उमेदवारी दिलीय. मात्र महायुतीला अरविंद सावंतांविरोधात अजुनही सक्षम उमेदवार मिळालेला नाही. ठाण्यात राजन विचारेंविरोधात शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. तर पालघरमध्ये ठाकरेंनी भारती कामडींना उमेदवारी दिलीय. मात्र पालघरमध्ये भाजप आपला उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात ठाकरेंकडून विनायक राऊतांनी उमेदवारी दाखल केलीय. मात्र महायुतीत सावंत विरुद्ध राणे कुटुंबात संघर्ष पेटलाय. नाशिकमध्ये ठाकरेंकडून राजाभाऊ वाजे मैदानात आहेत. पण अजित पवार गटाकडून छगन भुजबळांचं नाव पुढे आल्यामुळे हेमंत गोडसेंची अडचण वाढलीय. संभाजीनगरच्या जागेचा चंद्रकांत खैरेंना संधी मिळालीय. खैरें विरोधात महायुतीच्या उमेदवाराचा शोध सुरुच आहे.

भाजपच्या सर्व्हेनुसार या सहा जागांवर शिंदे गटाचे उमेदवार निवडून येणार नाहीत, असा असा अंदाज आहे. दरम्यान सर्वेच्या आडून भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा विश्वासघात केल्याची टीका भास्कर जाधवांनी केलीय.

दरम्यान, 6 जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाला संघर्ष करावा लागतोय. दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे शिंदेंची धाकधूक वाढलीय.. म्हणूनच श्रीकांत शिंदेंना कल्याणऐवजी ठाण्यातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जातेय. एकूणच लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला महाशक्तीसोबत युती करणं थोडसं महागात पडल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com