congress party should think while taking action on me says vishal patil  Saam Digital
लोकसभा २०२४

Vishal Patil : मी आजही काॅंग्रेसचा एकनिष्ठ, सही करणा-यांनी त्यांचा विचार करावा; विशाल पाटील संभाव्य कारवाईवर स्पष्टच बाेलले

Sangli Lok Sabha Election : संजय पाटील हे भाजपकडून उभे आहेत. म्हणून त्यांना मत पडतात. कोणाचे डिपॉजिट जप्त होईल असे मी म्हणणार नाही असे एका प्रश्नावर त्यांनी नमूद केले.

विजय पाटील

Sangli Congress :

मी कुठलाही नियम तोडला नाही. लेखी आदेश मला आला नाही. वसंतदादा घराणे मध्ये काँग्रेस आहे. माझ्यावर कारवाई करायची आहे तर सही करणा-यांनी विचार करावा. आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस पक्षासाठी (congress party) दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी असे मत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (vishal patil) यांनी केले. गुरुवारी सांगली येथे काॅंग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याचा अहवाल काॅंग्रेस श्रेष्ठींकडे पाठविला जाणार असल्याचे पाटील यांना विचारला असता त्यांनी माध्यमांशी बाेलताना मी आजही पक्षाचा एकनिष्ठ असल्याचे सांगितले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

पाटील पुढे बाेलताना म्हणाले कालच्या कार्यक्रमाला काय झाले माहीत नाही. कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. पण त्यांच्या भावना आहेत. त्या उमटल्या असतील आणि घोषणाबाजी झाली असेल. विश्वजित कदम यांनी पहिल्या पासून उमेदवारी मागितली होती. हा अन्याय काँग्रेस पक्षावर झाला. पण दुर्देव आहे. पुढच्या काळात विश्वजित कदम आमचे नेते असतील असेही विशाल पाटील यांनी नमूद केले.

सांगलीच्या तीन दुष्काळी तालुकच्या दौरा केला. पाण्यासाठी गावकरी कर्नाटक मध्ये जात आहेत. भाजपवर नाराजी लोकांची आहे. गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संजय पाटील यांच्यावर लोकांचा रोष आहे असेही विशाल पाटील यांनी नमूद केले. संजय पाटील हे भाजपकडून उभे आहेत. म्हणून त्यांना मत पडतात. कोणाचे डिपॉजिट जप्त होईल असे मी म्हणणार नाही असे एका प्रश्नावर त्यांनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाचा निकाल काकांची झाेप उडवेल

संजय पाटील यांनी आरोप केला की विशाल पाटील यांच्या भावाला पराभूत केले, विशाल यांना दुसऱ्यांदा पराभव करू. यावर विशाल पाटील याने उत्तर दिले. काकांनी चांगले स्वप्न बघावे पण निकाल वेळी त्याची झोप उडेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live: भंडारा, साकोली नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष

Nagarpalika Nagar Parishad Election Result: नागपूर जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश, वाचा संपूर्ण नगरपालिका आणि नगर परिषदांचा निकाल

Dahi Kadhi Recipe : दह्याची कढी फुटते? टेन्शन सोडा अन् झटपट 'हा' उपाय करा

Monday Horoscope: मेहनीचे फळ मिळेल, ५ राशींसाठी सोमवार ठरेल भाग्याचा; वाचा राशीभविष्य

Wedding Saree Patterns: लग्नसमारंभात तुम्हीच दिसाल रेखीव, 'या' नव्या पॅटर्नच्या साड्यांची आत्ताच करा खरेदी

SCROLL FOR NEXT