Monday Horoscope: मेहनीचे फळ मिळेल, ५ राशींसाठी सोमवार ठरेल भाग्याचा; वाचा राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

वेगवान वाहने चालवायला आवडेल. लांबच्या प्रवासाला जाल. तीर्थक्षेत्रि भेटी होतील.

मेष राशी | saam

वृषभ

कष्ट करून धडपडून आपल्याला हवे ते मिळवावे लागेल. यामध्ये आपल्या लोकांची सुद्धा साथ मिळेल असे वाटत नाही. मृत्यू भय दाटेल.

वृषभ राशी | saam

मिथुन

संततीकडून विशेष पराक्रम आज घडेल. जे ठरवाल ते होईल. व्यवसायामध्ये आयोजन नियोजन आणि आपले निर्णय सकारात्मक आणि योग्य ठरतील.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

एखाद्याशी आपण किती आपलेपणाने वागलो तरी आपल्याला तशी समोरच्याकडून वागणूक मिळत नाही. आपली रस मुळातच हळवी आणि वात्सल्य पूर्ण आहे.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

आपला अहंकार बाजूला ठेवून कामे करायला लागतील. कलाक्षेत्र, क्रीडाक्षेत्र, राजकारण, उपासना, अध्यात्मक क्षेत्र सर्व ठिकाणी आज प्रगतीचे योग आहेत.

सिंह राशी | saam

कन्या

आनंदाचे समीकरण आणि व्याख्या आज आपल्याला कळतील .घरी छोटे धार्मिक कार्य होतील. वाहन विकत घ्यायचं असेल तर दिवस चांगला आहे. नव्याने आनंदाच्या वाटा आयुष्यात येतील मातृसौख्य उत्तम .

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

"गरजेल तो बरसेल काय" असा काहीसा दिवस आहे. आपल्या मधली असणारी ताकत आज ओळखून येईल. न बोलता कामे कराल आणि दणदणीत यश मिळवाल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

व्यवसायामध्ये नव्या काही गोष्टी करण्यासाठी आजचा दिवस तितकाचा योग्य नाही. "धीर धरे धीरापोटी फळे रसाळ गोम" असा दिवस आहे. घाईगडबडीने निर्णय घेऊ नका.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

एक वेगळी लहर आणि उमेद आजचा दिवसात तुमच्याकडे असेल. दमणूक, कटकटी, नैराश्य या सर्व गोष्टी आज तुम्ही बाजूला ठेवा.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आपण करत असलेल्या गोष्टी स्वतः करत नसतो तर कुणीतरी दैवी शक्ती या मागे कार्य करते हे जाणवेल. मनासारखे घडले नाही तरी अध्यात्माची कास धरा.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

जितके काही आजपर्यंत पुण्य केले आहे त्याचे फळ आज तुम्हाला पदरात मिळेल. मग नाती असो पैसा असो व्यवहार असो किंवा स्वतः तील केलेली गुंतवणूक सुद्धा आज कामी येईल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

"केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" असा दिवस आहे. खूप कामे कराल. खूप यश मिळवाल खूप सन्मान मिळतील. खूप आदर मिळेल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: Jio New Plan: जिओचा 200 दिवसांचा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान आलाय, अनलिमिटेड 5Gची लुटा मजा

Jio 200 days plan | google
येथे क्लिक करा