Sakshi Sunil Jadhav
सध्या लग्नाची धामधूम सुरु असताना महिलांमध्ये एक चर्चा सातत्याने सरु असते ते म्हणजे साड्यांच्या नव्या पॅटर्नची. त्यामुळे गोंधळात न पडता तुम्ही पुढच्या हटके लूकनुसार साड्या निवडा.
हलके, श्वास घेण्यास सोपे आणि नैसर्गिक फ्लो असलेले Liva फॅब्रिक 2025 मधील साड्यांसाठी महिलांची पहिली पसंती ठरले.
Liva साड्या हलक्या असूनही लक्झरी लुक देतात, त्यामुळे दीर्घ कार्यक्रम, लग्न समारंभ आणि सणांसाठी त्या आदर्श ठरल्या.
सॉफ्ट पेस्टल रंग, साधे पण ठळक बॉर्डर आणि डिटेल्ड ब्लाऊज यामुळे Less is More ही संकल्पना लोकप्रिय झाली.
सिल्व्हर, ग्रेफाइट आणि लिक्विड गोल्ड शेड्समधील मेटॅलिक साड्या रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये ट्रेंडमध्ये राहिल्या.
मेटॅलिक साड्यांसोबत स्लीक बन हेअरस्टाइल आणि वेट मेकअप लुकने सायबर-ग्लॅम स्टाइलला लोकप्रियता मिळाली.
बोटॅनिकल डिझाईन्स, अॅब्स्ट्रॅक्ट प्रिंट्स असलेल्या साड्यांनी डे-टू-नाईट लुकसाठी महिलांची मने जिंकली.
लेयर्ड ड्रेप्स, केप ब्लाऊज, बेल्ट्स आणि वेगवेगळ्या फॅब्रिक्समुळे साडीला आधुनिक ट्विस्ट मिळाला.