Congress Leader Prithviraj Chavan Claims BJP Distributed Money To Voters In Satara Constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024: सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

Satara Lok Sabha Constituency News: दोन्ही पवारांनी या पक्षफुटीचा घटनाक्रम पुस्तकरूपी समोर आणावा, तेंव्हाच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असे पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवार आणि अजित पवारांना आवाहन केलं आहे.

संभाजी थोरात

सातारा लाेकसभा मतदारसंघात विशेषत: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पैशांचे वाटप झाल्याचा दावा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना आमदार चव्हाण यांनी बारामती मतदारसंघात पैसे वाटप झाले की नाही याची मला माहिती नाही परंतु सातारा लोकसभा मतदारसंघात पैशांचे वाटप झाले हे मी ठामपणे सांगू शकताे असे नमूद केले.

नोटांची बंडलं काँग्रेस नेत्यांकडे का सापडतात? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला. त्यावर बाेलताना आमदार चव्हाण म्हणाले कारण मोदींनी लोकसभेत कॅशलेस यंत्रणा वापरली. त्यामुळं त्यांचे नोटांची बंडल सापडत नाहीत. महायुतीने काहीही अन् कसं ही केले तर आमचा विजय ते रोखू शकत नाहीत असा विश्वास आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

बारामतीतील मतदानापूर्वी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके हे अजित पवार यांनी सत्तेत जाण्यापूर्वी शरद पवार यांची समंती घेतली असा गौप्यस्फोट केला हाेता यावर बाेलताना आमदार चव्हाण म्हणाले असं मला वाटत नाही.

शरद पवार आणि सुप्रिया सुळेंबद्दल ते आधीपासूनच बोलत आहेत. मात्र दोन्ही पवारांनी या पक्षफुटीचा घटनाक्रम पुस्तकरूपी समोर आणावा, तेंव्हाच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असे चव्हाणांनी शरद पवार आणि अजित पवारांना आवाहन केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

Aloe Vera Benefits For Skin: हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय?

अमेरिकेत मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा|VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर, सांगोल्यात मोठी राजकीय घडामोड

SCROLL FOR NEXT