Ramdas Athawale on Congress Party:
''काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करणार, ही मागणी माझी कॉपी केली आहे. ही मागणी मी अनेक वर्षांपासून करत होतो, असं म्हणत केंद्रित मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. दिल्ली येथे एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.
या पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले की, ''लोकसभा निवडणुकीचा माहोल देशभरात सुरू आहे. देशात एनडीएने मोदींच्या नेतृत्वात ४०० पारचा नारा दिला आहे. मोदींच्या विकासाच्या रथाला रोखण्यासाठी इंडिया आघाडी वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. भाजप, मोदी यांनी वारंवार सांगितल आहे की, आरक्षणाला कुठलाही धक्का लावणार नाही. मात्र राहुल गांधी वारंवार आरोप लावत आहेत की, आरक्षण हटवणार आहेत.''
ते म्हणाले, इंडिया आघाडीचे नेते चुकीच्या आफवा पसरवून दलीत समाजात दिशाभूल करत आहेत. मोदींबद्दल चुकीच्या गोष्टी इंडिया आघाडी पसरवत आहे. मात्र आरक्षण हटणार नाही, हे मी सांगतो. मोदी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षण २७ टक्के करण्याचा निर्णय घेतला. आरक्षण देण्याची भूमिका संविधान सभेने घेतली होती, तेव्हा ते धर्माच्या आधारे देणार नाही, असं ठरलं होतं. मी राहुल गांधी यांच्या वक्तव्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.''
रामदास आठवले पुढे म्हणाले, ''बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी मोदींनी काम केलं. जम्मू काश्मीरमध्ये देशाचं संविधान लागू नव्हतं. मात्र 370 कलम हटवल्यानंतर तिथेही संविधान लागू झालं आहे.''
आठवले म्हणाले, ''जनगणना लवकरात लवकर झाली पाहिजे.'' अदाणी आणि अंबानी यांचा उल्लेख करत ते म्हणाले, ''अदाणी आणि अंबानी व्यावसायिक आहेत. त्यांनी लाखो लोकांना रोजगार दिले आहेत. राहुल गांधी अडाणी आणि अंबानी विरोधात बोलत होते. मात्र आता बोलत नाही. म्हणजे दाल मे कुछ काला हैं.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.