Rajendra Gavit  Google
लोकसभा २०२४

Palghar Politics: पालघरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का; खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश

Rajendra Gavit Will Join BJP: पालघरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.

Rohini Gudaghe

ऐन निवडणुकीत पालघरमध्ये (Palghar Politics) शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. भाजपच्या मुंबईतील कार्यालयात प्रवेश सोहळा झालेला आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील राहणार हजर होते. पालघरमधून यंदा शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने (Rajendra Gavit Will Join BJP) गावित नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी केली आहेत. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार राजेंद्र गावित म्हणाले की, मी देवेद्रं फडणवीस आणि बावनकुळे यांचे आभार व्यक्त करतो. २०१८ ची निवडणूक चुरशीची झाली. उद्धव ठाकरेंनी तेव्हा मागणी केली होती की, पालघरची जागा आम्हांला पाहिजे. आता मी शिंदे गटातून खासदार म्हणून काम केलं आहे. आता फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. आज मी घरवापसी करत आहे. याचा आनंद होत असल्याचं म्हणत गावित यांनी मुख्यमंत्र्यांना देखील धन्यवाद व्यक्त केले आहेत.

तर खासदार गावित यांच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील निवडणुकीत गावित पालघरमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ साली शिवसेनेशी युती झाली. तेव्हा शिवसेनेने पालघरची जागा आम्हाला उमेदवारी सहीत द्या, अशी अट ठेवली होती. तेव्हा मी गावित यांनी विनंती केली होती की, तुम्हे उभे रहा. ते उभे राहिले आणि निवडून आले. आज पुन्हा एकदा ती जागा भाजपला मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांना इतिहास माहित असल्यामुळे त्यांनी संमती दिल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाला मिळाला आहे. त्यामुळे भाजपाने पालघर लोकसभा मतदारसंघाची (Shiv Sena Palghar MP Rajendra Gavit) उमेदवारी हेमंत सावरा यांना दिली आहे. त्यामुळे राजेंद्र गावित यांना पालघरची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. नाराजीमधूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असं बोललं जात आहे.

पालघरमध्ये राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिंदे गटाला (CM Eknath Shinde) मोठा बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राजेंद्र गावित यांनी राज्यातील आणि केंद्रातील पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला नाही, असं वक्तव्य केलं होतं. तर गावित यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे. उमेदवारी नाकारल्याने खासदार गावित यांच्यात नाराजीचा सुर उमटला होता. त्याचा परिणाम आता समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT