Loksabha Election 2024: Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: काय सांगता! आनंदाच्या शिध्यात देणार बिअर अन् व्हिस्की; महिला उमेदवाराचं अजब- गजब आश्वासन

Loksabha Election 2024: एका महिला उमेदवाराने तर चक्क आनंदाचा शिधा वाटपात दारू मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच जिवनावश्यक वस्तूंसह मद्य पण द्यावे, अशी अजब भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur Loksabha Constituency News:

निवडणुकीत लोकप्रिय होण्यासाठी उमेदवार काय काय घोषणा करतील, याचा काही नेम नाही. चंद्रपुरात अशाच एका महिला उमेदवाराने तर चक्क आनंदाचा शिधा वाटपात दारू मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच जिवनावश्यक वस्तूंसह मद्य पण द्यावे, अशी अजब भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

वनिता राऊत या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावातील रहिवासी आहेत. यापूर्वी त्या नागपूर येथून 2019 ची लोकसभा, 2019 मध्ये चिमूर विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यावेळी जिल्ह्यात दारुबंदी होती. यामुळे त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी उठवून ठिकठिकाणी दारूची दुकाने उघडण्यात यावी, अशी मागणी केली होती. तसेच गाव तिथे दारूचे दुकान, असे त्यांचे धोरण होते.

समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे चूक आहे. जर आपण निवडून आलो तर गावोगावी बेरोजगार तरूणांना दारूचे परवाने उपलब्ध करून देणार तसेच दारिर्द्य रेषेखालील जनतेला बिअर, व्हिस्की सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणार, अशी आश्वासने त्यांनी दिली होती. या अजब आश्वासनांमुळे त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आता याही लोकसभा निवडणुकीत त्यांनी तीच भूमिका पुन्हा जाहीर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळीनिमित्त शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा दिला जातो. यात जीवनाश्यक वस्तू दिल्या जातात. मात्र या आनंदाच्या शिध्यामध्ये व्हिस्की, बिअर सामील करणे आवश्यक आहे. आपण जर निवडून आलो तर खासदार निधीचा उपयोग करत आपण आनंदाच्या शिध्यासोबत व्हिस्की आणि बिअर देणार आणि हा मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर जाणार, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सगळेच उमेदवार विकासाच्या बाता करीत असताना वनिता राऊत मात्र थेट मुद्याला हात घालत आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा जोरात आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सदाभाऊ खोतांची पंचाईत, शेतकऱ्यांनी बांध्यावर थांबूही दिलं नाही; थेट हिशोबच मागितला | VIDEO

Rashi Bhavishya: सोमवारपासून या ३ राशींचे नशीब चमकणार, पैसा अन् प्रेमाचा वर्षाव होणार

Maharashtra Live News Update: शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष; प्रकृती गंभीर

Soft Idli Recipe: इडली फुगतच नाही? बॅटरमध्ये घाला '१' पदार्थ, सॉफ्ट - साऊथ स्टाईल इडलीचं सिक्रेट

BSNL Prepaid Plan: स्वस्तात दमदार ऑफर! बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा दररोज 2.5GB डेटा आणि अनेक फायदे

SCROLL FOR NEXT