PM Modi, Amit Shah, J. P. Nadda SAAM TV
लोकसभा २०२४

BJP Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चौथी यादी जाहीर, प्रसिद्ध अभिनेत्रीला उमेदवारी

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीत पुडुचेरी आणि तामिळनाडूमधील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Gangappa Pujari

BJP Fourth Candidate List:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीत पुडुचेरी आणि तामिळनाडूमधील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुक सात टप्प्यात होणार असून 19 एप्रिल रोजी मतदान सुरू होणार आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरी लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिललाच मतदान होणार आहे.

भाजपच्या चौथ्या यादीत तामिळनाडूतील 14 उमेदवारांची नावे आहेत. पक्षाने जाहीर केलेल्या या यादीमध्ये तमिळनाडूतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका सरथकुमार (Radhika Sarathkumar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या विरुदनगर येथून निवडणूक लढवणार आहेत. तसेच चेन्नई उत्तरमधून आरसी पॉल कनागराज, तिरुवल्लूरमधून पोन व्ही बालगणपती, तिरुवन्नमलाईमधून ए अश्वथामन, नमक्कलमधून केपी रामलिंगम, त्रिपुरामधून एपी मुरुगानंदम, पोल्लाचीमधून के वसंतराजन, करूरमधून व्हीव्ही सेंथिलनाथन, एसएमटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तत्पूर्वी, एक दिवस आधी भाजपने तिसरी यादी जाहीर केली होती, ज्यात तामिळनाडूतील 9 उमेदवारांची नावे होती. तिसऱ्या यादीत तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांना कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. सोबतच तिसऱ्या यादीत दुसरे सर्वात मोठे नाव तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांचे होते. भाजपने त्यांना चेन्नई दक्षिणमधून तिकीट दिले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील लोकसभेच्या 39 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तामिळनाडूतून एकही जागा जिंकता आली नव्हती. यापूर्वी, भाजपने 2 मार्च रोजी 195 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यानंतर भाजपने 13 मार्चला 72 उमेदवारांची दुसरी आणि 21 मार्चला नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Liver damage symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर हळूहळू होतंय खराब

Cancer Tests: कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून करा 'या' चाचण्या, नाहीतर...; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Dagadu Sapkal: मोठी बातमी! मतदानाच्या ४ दिवसआधी ठाकरेंना जबरी धक्का, मुंबईतील माजी आमदार दगडू सपकाळ शिंदेसेनेत

SCROLL FOR NEXT