जुना इतिहास खोडून काढणार, दक्षिणेत PM मोदींना सर्वाधिक अपेक्षा; केलं मोठं वक्तव्य
PM Modi Interview Saam Tv
लोकसभा २०२४

PM Modi Interview: जुना इतिहास खोडून काढणार, दक्षिणेत PM मोदींना सर्वाधिक अपेक्षा; केलं मोठं वक्तव्य

Satish Kengar

PM Modi Interview:

दक्षिण भारतात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा एनडीए 400 हून जागा जिंगणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मोदी म्हणाले आहेत आहे की, आमची रणनीती संपूर्ण देशासाठी सारखीच आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार आणि 4 जून रोजी तो 400 पार.

रविवारी रात्री पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाजपची फारशी ताकद नाही, असं अनेक लोक म्हणतात. मात्र हा इतिहास आम्ही खोडून काढू. ते म्हणाले, तुम्ही फक्त 2019 च्या निवडणुका बघा, भाजप हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा पक्ष होता. यावेळीही तसेच होईल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही निवडणुकीत दक्षिण भारतात जास्तीत जास्त जागा जिंकू आणि फरक देखील गेल्या वेळेपेक्षा जास्त असेल. ते म्हणाले की, संपूर्ण प्रदेशात भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा या दोन्हींमध्ये वाढ झाल्याचे आपण पाहणार आहोत. देशातील लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 131 जागा दक्षिण भारतातील राज्यांमधून येतात. भाजपचे एकूण 29 लोकसभा खासदार येथून आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही पूर्व भारतातही मोठे यश मिळवू. त्यामुळे दिल्लीपासून भुवनेश्वर, कोलकातापर्यंत अनेकांची झोप उडाली आहे.

ते म्हणाले की, आम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळत असून यावरी आम्ही सगळेविक्रम मोडू. आम्ही देशभरात पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकू. हे विशेषतः पूर्व आणि दक्षिण भारतात होईल. एनडीए निश्चितपणे 400 पार करेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत ज्या टप्प्यांमध्ये मतदान झाले आहे. त्यांच्या विश्लेषणातून असे दिसून येते की, आघाडी करूनही काँग्रेस अनेक राज्यांत आपले खातेही उघडू शकलेली नाही. ते म्हणाले की, भाजप हा पहिल्या दिवसापासूनच राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही फक्त आमच्या भौगोलिक स्थितीमुळेच नाही तर आम्ही वैचारिक आधारामुळेही राष्ट्रीय पक्ष आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

Pune Tourist Places: पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी आणि काय आहेत नियम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT