Vijay Wadettiwar Saam TV
लोकसभा २०२४

Vijay Wadettiwar: भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी आणि ओबीसी समाजासाठी काहीच नाही: विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar On BJP Manifesto 2024: देशात सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने जनतेत आश्वासनांची खैरात वाटली. मात्र सत्तेवर येताच दिलेली आश्वासने हवेत विरली: विजय वडेट्टीवार

साम टिव्ही ब्युरो

Vijay Wadettiwar On BJP Manifesto 2024:

>> मंगेश भांडेकर

देशात सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने जनतेत आश्वासनांची खैरात वाटली. मात्र सत्तेवर येताच दिलेली आश्वासने हवेत विरली. गेल्या दहा वर्षात देशात महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड दरवाढ, शेतकरी कष्टकरी कामगार तसेच मागासवर्गात मोडणाऱ्यांचे अवहेलनाच करण्यात आली, अशी टीका करीत आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मतदान करून जनहिताच्या प्रश्नांसाठी लढणारे सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ गडचिरोली जिल्हयातील भामरागड, घोट कोरेगाव (चोप) येथे सभेला संबोधित करताना बोलत होते.

ते म्हणाले आहेत की, खोटे बोलून जनतेची लूट करीत व्यापारी ही जोपासणाऱ्या भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले. म्हणून अशा भाजप सरकारचा हिशोब चुकता करा.''

वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकारने देशातील शेतकऱ्यांची फसवणूक केली. खते औषध यांची किंमती वाढवल्या. यामुळे शेतकऱ्यांची लागवडी खर्चात प्रचंड वाढ झाली व उत्पादनाला हमीभाव मिळाला नाही त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलेला आहे.

भाजपच्या जाहीरनामातही मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी काहीच योजना नाही उलट इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात ओबीसींची जातीनिहाय जनगणना, महिलांना एक लाख रुपये सन्मान निधी, तरुणांना विद्यावेतन आणि शेतकऱ्यांना हमीभाव असा पंचसूत्री कार्यक्रम राबविण्याचे अभिवचन जाहीरनाम्यात दिले आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT