Supriya Sule On Salman Khan Galaxy Apt Firing:
Supriya Sule On Salman Khan Galaxy Apt Firing:Saam Tv

Salman Khan Firing: अब की बार गोळीबार सरकार, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर निशाणा

Supriya Sule On Salman Khan Galaxy Apt Firing: भररस्त्यावर जर गोळीबार होत असेल, तर अब की बार गोळीबार सरकार, हे जे मी अनेक महिने म्हणत आहे, त्यावर आणखी एक शिक्कामोर्तब झाला आहे: सुप्रिया सुळे

Supriya Sule On Salman Khan Galaxy Apt Firing:

''सामान खान यांच्या घराबाहेर जी घटना घडली आहे, ती धक्कादायक आहे. भररस्त्यावर जर गोळीबार होत असेल, तर अब की बार गोळीबार सरकार, हे जे मी अनेक महिने म्हणत आहे, त्यावर आणखी एक शिक्कामोर्तब झाला आहे,'' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्याची घडली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना त्या असं म्हणाल्या आहेत.

Supriya Sule On Salman Khan Galaxy Apt Firing:
Salman Khan Galaxy Apt Firing: 'सलमान खान यह तो ट्रेलर है...'; अनमोल बिश्नोईने घेतली जबाबदारी, फेसबुक Post Viral
Supriya Sule On Salman Khan Galaxy Apt Firing:
Maharashtra Election: मुख्यमंत्री आणि गोडसेंचा एकाच कारने प्रवास; ठाणे ते दादरच्या प्रवासात काय झाली चर्चा?

सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, काही महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात गोळीबार झाला. सत्तेत असलेल्या आमदाराने गोळीबार केला होता. पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याची हे लोक हिम्मत करत असतील तर रस्त्यावर गोळीबार करणे हे सत्तेतील लोकांना फार काही वाटणार नाही.

त्या म्हणाल्या की, सुसंस्कृत पुण्यात कोणाला कोयता गॅंग माहीत नव्हती. ती अधून-मधून डोकं वर काढते. यावर कायस्वरूपी निर्णय का होत नाही? महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्याच अपयश आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, ''तुमचं महाविकास आघाडी सरकार अबकी बार वसुली सरकार होतं का? एवढी वसुली केली की सुप्रिया सुळे यांच्या पक्षातील नेत्याला जे तेव्हा गृहमंत्री होते त्यांना अटक झाली होती.''

ते म्हणाले, ''अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर काल गोळीबार झाला. आम्ही जनतेला विश्वास देऊ इच्छितो की, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे. हे महाविकास आघाडीचा सरकार नाही. जिथे उद्योजकांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणार आणि मग सचिन वाझे त्याचा हिस्सा होणार. असं व्हायला हे काही उद्धव ठाकरे सरकार नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com