Mukesh Dalal Won From Surat Lok Sabha Election 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Surat Election Result 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं, सूरतमधून मुकेश दलाल बिनविरोध, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Mukesh Dalal Won From Surat Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणूक मतदानाचे अद्याप सहा टप्पे शिल्लक असताना भाजपनं विजयाचं खातं उघडलं आहे. सूरत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत.

Pramod Subhash Jagtap

Surat Lok Sabha Election Result 2024

लोकसभा निवडणूक मतदानाचे अद्याप सहा टप्पे शिल्लक असताना भाजपनं विजयाचं खातं उघडलं आहे. सूरत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी आणि पर्यायी उमेदवाराचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. तसेच इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सूरत लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात मुख्य लढत होती. मात्र काँग्रेसचे सूरत मतदारसंघाचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. त्यांच्या अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती असल्याचा मुद्दा उपस्थित करत हा अर्ज बाद ठरवण्यात आल्याचे सांगितले जाते. कुंभानी आणि पर्यायी उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्याने येथील निवडणूक शर्यतीतून काँग्रेस 'आऊट' झाल्याचे चित्र आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.

निवडणूक अधिकारी सौरभ पारघी यांनी निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. तिन्ही अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती असल्याचे कारण त्यांनी दिले. कुंभानी यांच्यासोबतच पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला.

या दोघांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अर्जांवरील अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती आढळून आली. त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यानंतर येथील आठ अपक्ष उमेदवारांनीही आपले नावे मागे घेतील. त्यानंतर मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले आहेत.

दरम्यान, सूरत लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर स्थगिती आणावी या मागणीसाठी काँग्रेस गुजरात हायकोर्टात धाव घेणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनीही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

>> Edited by Satish Kengar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

SCROLL FOR NEXT