Amravati Lok Sabha Constituency: 6 Villages From Melghat Refused To Vote Know What is The Reason? Saam TV
लोकसभा २०२४

Amravati Lok Sabha Voting: मोठी बातमी! अमरावतीतील तब्बल ६ गावांचा मतदानावर बहिस्कार; काय आहे कारण?

Amravati Lok Sabha Election 2024 Voting Day News: अमरावतीमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेळघाटमधील तब्बल ६ गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

Satish Daud

महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी (ता. २६) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अशातच अमरावतीमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेळघाटमधील तब्बल ६ गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत मेळघाटमधील ६ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती आहे. सकाळपासून गावातील नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडलेले नाही. यामुळे मतदानाच्या आकडेवारीवर मोठा परिणाम होणार असून याचा फटका नेमका कोणत्या पक्षाला बसणार? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष पूर्ण झाली असताना आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे. मतदानावर बहिष्कार टाकलेल्या गावांमध्ये रंगबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, आणि खोपमार या गावातील नागरिकांचा समावेश आहे.

गेल्या ७७ वर्षांपासून आम्ही मूलभूत सुविधांपासून वंचित असून आम्ही निवडून दिलेले एक ही प्रतिनिधी आमच्या समस्यांच्या निराकरण करण्यास तत्पर दिसत नाही. पिण्याचे पाणी, विद्युत , पक्के रस्ते यासारख्या एकही सुविधा आम्हाला मिळाल्या नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधीकडे आम्ही मागणी केली असता आमच्या समस्यावर तोडगा निघाला नाही. जोपर्यंत आमच्या समस्या निकाली निघत नाहीत, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT