Amol Kolhe Viral Speech Ahmednagar: Saamtv
लोकसभा २०२४

Amol Kolhe: हमारे पास गाडी, बंगला.. निलेश लंके तुम्हारे पास क्या है? अमोल कोल्हेंचे भाषण अन् टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस| VIDEO

Amol Kolhe Viral Speech Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांनी निलेश लंकेंच्या प्रचारार्थ नगरमधील केलेले जबरदस्त भाषण चांगलेच व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात अहमदनगर|ता. ६ मे २०२४

राज्यात सध्या लोकसभेचे धुमशान सुरू आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय सभा, रॅली, दौऱ्यांना जोर आला आहे. या सभांमधील राजकीय नेत्यांची भाषणे, आरोप- प्रत्यारोप, टीका, टोमणे अन् फटकेबाजी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांनी निलेश लंकेंच्या प्रचारार्थ नगरमधील केलेले जबरदस्त भाषण चांगलेच व्हायरल होत आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

"इथे जशी परिस्थिती आहे, तशीच शिरुरमध्येही आहे. आमच्याकडेही मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या अनेक सभा झाल्या आहेत. पुढेही होणार आहेत आणि एक उपमुख्यमंत्री तर त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक झाल्यानंतर शिरूरमध्येच येऊन बसतील असे सांगत नगर दक्षिणमध्येही सहा सात सभा लागल्यात, अशा वेळी दिवार सिनेमातील डायलॉग आठवतो.मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पास क्या है?" असे अमोल कोल्हे म्हणाले.

तसेच " सत्ताधारी म्हणतात आमच्याकडे मुख्यमंत्री आहे, २ उपमुख्यमंत्री आहेत. २०० आमदार आहेत. अफाट पैसा, राज्यातील सत्ता आहे, केंद्रातील सत्ता आहे. निलेश लंके तुमच्याकडे काय आहे? तेव्हा निलेश लंके सांगतात माझ्याकडे मायबाप जनता आहे, असे म्हणत निलेश लंके यांच्याजवळ जनतेचा कौल आहे आणि त्यामुळेच निलेश लंके हे निवडून येतील," असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

अमोल कोल्हेंच्या या फटकेबाजीने संपूर्ण सभेमध्ये टाळ्या शिट्ट्या अन् घोषणांचा कडकडाट पाहायला मिळाला. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल माडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांना शिरुरमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्याचसोबत ते पक्षाचे स्टार प्रचारकही आहेत. त्यामुळे सकाळी शिरुरमध्ये प्रचार करुन सायंकाळी ते राज्यभरात सभा गाजवताना दिसत आहेत. त्यांच्या खास शैलीतील फटकेबाजीची भाषणे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT