Nashim Khan: काँग्रेस हायकमांडची मनधरणी यशस्वी! ९ दिवसांनंतर नसीम खान यांचा राजीनामा मागे; प्रचारात सक्रिय होणार

Loksabha Election News: काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मध्यस्थी केल्यानंतर नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Mumbai Loksabha Election 2024
Mallikarjun Kharge On Naseem KhanSaam Tv
Published On

विनय म्हात्रे, मुंबई|ता. ६ मे २०२४

लोकसभेच्या उमेदवारीवरुन नाराज झालेले काँग्रेसचे नेते नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना अखेर यश आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मध्यस्थी केल्यानंतर नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच ते यापुढे प्रचारामध्येही सक्रिय होणार आहेत.

नसीम खान हे महाराष्ट्र काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनीचा र वेळा आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले असून सध्या ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत. ते लोकसभा निवडणुकांचे स्टार प्रचारकही होते. मात्र वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत प्रचारक समिती पदाचा राजीनामा दिला होता.

नसीम खान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. पुण्यातील सभेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांची भेट घेत समजूत काढली होती. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला होता. अखेर पक्षश्रेष्ठींची ही मनधरणी यशस्वी झाली असून नसीम खान यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली आहे.

Mumbai Loksabha Election 2024
व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

काय म्हणाले नसीम खान?

"मी पक्षाचा निष्ठावन कार्यकर्ता आहे.पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या पत्राचा विचार केला. त्यामुळे मी दिलेला राजीनामा मागे घेत आहे, अशी घोषणा करत माझ्यासोबत राज्यातील ज्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे मागे घ्यावेत.आजपासून आम्ही राज्यात धुव्वाधार प्रचार करु, वर्षा गायकवाड आमची लहान बहिण आहे. २ लाखाच्या लिडने निवडून येतील, असा दावाही नसीम खान यांनी यावेळी केला.

Mumbai Loksabha Election 2024
Nashik Lok Sabha: ठाकरेंच्या उमेदवाराला शह देण्यासाठी CM शिंदेची मोठी खेळी; नाशिकमध्ये काहीतरी मोठं घडणार!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com