Amit Shah and Narendra Modi SAAM TV
लोकसभा २०२४

Amit Shah: अखेरच्या टप्प्याआधीच बहुमताचा दावा! लोकसभेत किती जागा जिंकणार? अमित शहांनी सांगितला 'फिक्स' आकडा

Amit Shah On Loksabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण नसल्याचा दावा अनेक राजकीय विश्लेषक करत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत मोठा आकडा सांगितला आहे.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. २७ मे २०२४

लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून पंतप्रधान मोदी हॅट्रिक मारणार की इंडिया आघाडी धक्का देणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. एकीकडे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण नसल्याचा दावा अनेक राजकीय विश्लेषक करत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत मोठा आकडा सांगितला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

काय म्हणाले अमित शहा?

"या लोकसभा निवडणुकीत आम्ही १० वर्षात केलेल्या कामांसह २५ वर्षांचा सकारात्मक अजेंडा घेऊन जनतेसमोर गेलो. लोकसभेच्या निकालात आम्ही सुस्थितीत आहोत. ३०० ते ३१० च्या मध्ये आम्हाला जागा मिळतील, असा मोठा दावा अमित शहा यांनी केला. यामध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा समावेश नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच यावेळी बोलताना अमित शहा यांनी राज्यातील सत्तासंघर्षावरुन शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. "२०१९च्या निवडणुकीत आम्हाला बहुमत होते. उद्धव ठाकरे आमचे मित्र होते. आम्ही एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र शरद पवार यांनी आमच्यापासून उद्धवजींना तोडले. ज्याने हे सुरू केले त्यानेच हे सर्व संपवायला पाहिजे, असे ते म्हणाले.

"सुरूवातीला ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी स्थिती होती. मात्र गेल्या महिन्यापासून विरोधी पक्षांच्या बाजूनेही हवा असल्याचे दिसत आहे. विरोधकही उत्साहाने लढा देत आहेत, मात्र निकालानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल," असेही अमित शहा पुढे म्हणाले.

"मी लडाख वगळता संपूर्ण भारताचा प्रवास केला. यामध्ये मला असे जाणवले की लोकांमध्य अशी भावना आहे की एक निर्णायक सरकार, निर्णायक नेता असायला हवा. मोदींजींनी चांगले काम केले. त्याचा आम्हाला फायदा झाला. लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. सामूहिक आत्मविश्वास हा कोणत्याही देशाच्या विकासाचे कारण असतो," असेही अमित शहा यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चित्रपटसृष्टीत खळबळ, पोलिसांचा तपास सुरु

विरार-डहाणू लोकलमध्ये तुफान राडा! पुरुष प्रवाशांनी एकमेकांना अक्षरशः तुडवलं; व्हिडिओ झाला व्हायरल

Maharashtra Live News Update : ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागपुरात नागरी सत्कार सोहळा

ChatGPTचं नवं फीचर! विद्यार्थ्यांना अभ्यासात होणार मदत; कशी? वाचा सविस्तर

Dhadak 2 : सिद्धांत चतुर्वेदी अन् तृप्ती डिमरीची अनोखी प्रेमकथा, वाचा 'धडक 2' चं ओटीटी अपडेट

SCROLL FOR NEXT