Nashik News: मनसेच्या मिसळ पार्टीला नाराजीची फोडणी! २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी मांडली खदखद; तक्रारींचा पेनड्राईव्ह राज ठाकरेंकडे देणार

MNS Misal Party News Nashik: निवडणुकांच्या धावपळीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवत मिसळ पार्टीचा बेत करण्यात आला होता.
Nashik News: मनसेच्या मिसळ पार्टीला नाराजीची फोडणी! २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी मांडली खदखद; तक्रारींचा पेनड्राईव्ह राज ठाकरेंकडे देणार
MNS Misal Party News Nashik: Saamtv

नाशिक, ता. २७ मे २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे वादळ आता शांत झाले आहे. दोन महिन्यांच्या धुमशानानंतर राजकीय पक्षांकडून स्नेहभोजन, सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिकमध्येही निवडणुकांच्या धावपळीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवत मिसळ पार्टीचा बेत करण्यात आला होता. मात्र या मिसळ पार्टीत ताव मारण्याऐवजी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यांसमोर मनातील खदखद अन् नाराजीचा पाढा वाचला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीनंतर नाशिकमधील काही मनसे कार्यकर्त्यांकडून मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मिसळ पार्टीच्या निमित्ताने शहरातील शेकडो कार्यकर्ते एकत्र झाले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान अंतर्गत झालेली कुरघोडी, नाराजी अन् खदखद व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला.

लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खर्चाला ही पैसे नसल्याची तक्रार काहींनी मांडली. तर मोजक्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते लक्ष्मी दर्शनापासून वंचित राहिल्याची नाराजी काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पार्टीला आलेल्या २००हून अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त केली.

Nashik News: मनसेच्या मिसळ पार्टीला नाराजीची फोडणी! २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी मांडली खदखद; तक्रारींचा पेनड्राईव्ह राज ठाकरेंकडे देणार
Amravati Crime: बँक अधिकारी पत्नीची निर्घृण हत्या, सासरच्यांनी आत्महत्येचा बनाव रचला पण... भयंकर घटनेने अमरावती हादरलं!

दरम्यान, कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली नाराजी, तक्रारी, पक्षातील पदाधिकाऱ्यांबाबतच्या भावना याचे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. या नाराज कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियाचा पेन ड्राईव्ह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सादर केला जाणार आहे. या तक्रारींबाबत, नाराजीनाट्याबाबत मनसे अध्यक्ष आता काय भूमिका घेणार? कार्यकर्त्यांची नाराजी कशी दुर करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Nashik News: मनसेच्या मिसळ पार्टीला नाराजीची फोडणी! २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी मांडली खदखद; तक्रारींचा पेनड्राईव्ह राज ठाकरेंकडे देणार
Maharashtra Politics: लोकसभेनंतर विधान परिषदेच्या उमेदवारीचा पेच! महायुती- मविआमध्ये इच्छुकांची गर्दी; ठाकरेंच्या 'सांगली पॅटर्न'ने डोकेदुखी वाढणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com