Maharashtra Assembly Election : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; राजकीय नेत्यांची लगबग सुरु होणार

Maharashtra Assembly Election Update : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबर रोजी संपणार असल्याने ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; राजकीय नेत्यांची लगबग सुरु होणार
Maharashtra Assembly Election Saam tv

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचा आता फक्त ७ वा टप्पा बाकी आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर हरियाणाचीही मुदत ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे राज्यात विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीची मुदत संपण्याआधी किंवा मुदतीच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते. त्यानुसार, हरियाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे या तारखेच्या दुसऱ्या दिवशी हरियाणात नवी विधानसभा येणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्राची विधानसभा २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा येणे गरजेचे आहे. या दोन्ही विधानसभेच्या मुदतीत २३ दिवसांचा फरक आहे. त्यामुळे दोन्ही राज्याच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; राजकीय नेत्यांची लगबग सुरु होणार
Nashik News: मनसेच्या मिसळ पार्टीला नाराजीची फोडणी! २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी मांडली खदखद; तक्रारींचा पेनड्राईव्ह राज ठाकरेंकडे देणार

दिवाळीच्या सणादरम्यान निवडणुका घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या निवडणुका दिवाळीआधीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीचं मतदान २१ ऑक्टोबरला झालं होतं. त्यामुळे यंदाही हरियाणा आणि महाराष्ट्रात २१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान मतदान होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; राजकीय नेत्यांची लगबग सुरु होणार
Pune Porsche Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलची अदलाबदल; ससूनमधील दोन डॉक्टरांना पोलिसांकडून अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com