लोकसभा २०२४

Lok sabha Election: अजित पवार यांना धक्का; लोकसभा निवडणुकीत 'या' ठिकाणी नाही वापरता येणार पक्षाचं चिन्ह, काय आहे कारण?

Lakshadweep Loksabha : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(प्रमोद जगताप, नवी दिल्ली)

Nationalist Congress Party Clock Symbol :

लोकसभा निवडणुकीदरम्यान एक मोठी बातमी हाती आली आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने घड्याळ हे चिन्हं वापरू नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत. यामुळे अजित पवार यांना निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. लक्षद्वीप लोकसभेसाठी घड्याळ चिन्ह मिळणार नाहीये. महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये तूर्तास चिन्हं वापरायला परवानगी आहे. (Latest News)

लक्षद्वीपमध्ये पाहिल्या टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. लक्षद्वीपमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युसूफ टी पी यांना दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादीचा अर्ज उशिरा दाखल झाल्यामुळे आयोगाने हा निर्णय दिलाय. दरम्यान महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चिन्ह वापरता येणार आहे.येथील सार्वत्रिक निवडणुकांत अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे, यासाठी त्यांनी अर्ज केला होता. चिन्ह आदेश परिच्छेद १० नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जात असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: दादा भुसे यांच्या हस्ते अमरावती मध्ये पार पडला शासकीय ध्वजारोहन सोहळा

स्वातंत्र्यदिनी पुण्यात पाणी नाही, शहरातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद; नेमकं कारण काय?

Imtiaz Jaleel: इम्तियाज जलील यांच्याकडून सर्व महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आज चिकन, मटन पार्टीचे नियंत्रण|VIDEO

Bhaskar Jadhav: ब्राह्मणविरुद्ध मराठा वादाची ठिणगी; भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं

Maharashtra Rain Update: पुढचे ४ दिवस तुफान पावसाचे, कोकणासह विदर्भाला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांसाठी अलर्ट?

SCROLL FOR NEXT