Ajit Pawar Saam Digital
लोकसभा २०२४

Ajit Pawar : विकास निधीसंदर्भात केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल; अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Election Commission Of India : विकास निधीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने अजितदादांच्या विधानाची गंभीर दखल घेतलीय आणि जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना अवहाल पाठवण्याचे आदेश दिलेत.

Sandeep Gawade

विकास निधीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने अजितदादांच्या विधानाची गंभीर दखल घेतलीय आणि जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना अवहाल पाठवण्याचे आदेश दिलेत.पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट.

बारामतीच्या प्रचारात केलेल्या या विधानामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणुक आय़ोगानेही या वक्तव्याची गंभीर दखल घेत यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेत. तर शरद पवारांनीही त्यांच्या या वक्तव्यावरून टोला लगावलाय.

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही अजितदादांवर निशाणा साधला होता. मतदारांना विकासनिधीचं प्रलोभन दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी मात्र अजित पवार यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलंय. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली होती. आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुस्तक घेऊन परीक्षेला बसा, CBSE चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Sonalee Kulkarni : लाल परी! सोनालीच्या बोल्ड लूकनं केलाय कहर, पाहा PHOTOS

सासरच्या छळाला कंटाळली, विवाहितेनं घरातच आयुष्य संपवलं; माहेरच्या मंडळींना वेगळाच संशय

Skin Care Tips : रोजच्या आहारातील या पदार्थांमुळे होतंय तुमच्या त्वचेचे नुकसान

SCROLL FOR NEXT