Aaditya Thackeray Speech  Saam Digital
लोकसभा २०२४

Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

Aaditya Thackeray Kolhapur Speech : मुख्यमंत्री कोल्हापुरात कितीही ठाण मांडूदेत पण कोल्हापुरची जनता महाविकास आघाडीसोबस आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

Sandeep Gawade

मुख्यमंत्री कोल्हापुरात कितीही ठाण मांडूदेत पण कोल्हापुरची जनता महाविकास आघाडीसोबस आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे. एकनाथ शिंदे गटाचे कोल्हापूरमध्ये संजय मंडलीक आणि धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदेंनी या मतदारसंघात ठाण मांडली आहे. नरेंद्र मोदींच्या सभाही या मतदारसंघात होत आहेत. त्यावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळत आहे तर देशात इंडिया आघाडीला. भाजप जिंकणार नाही मात्र चुकून जिंकली तर त्यांचं पहिलं टार्गेट संविधान आहे. भाजपला संविधान बदलायचा आहे. लोकशाही संपवून टाकायची आहे, ते आम्ही होऊ देणार नाही. महाराजांच्या विरोधात इथं प्रचार करणं हा भाजपाचा महाराष्ट्र द्वेष देशासमोर आला आहे.

पहिला गुजरातमधील कांदा निर्यात बंदी हटवली. त्यामुळं सगळं काही गुजरात साठी चालल आहे, यात महाराष्ट्र कुठे आहे ? नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेनंतर महाविकास आघाडीची मतं दुप्पट होतील. जे गुजरातला पळून जाऊन टेबलवर नाचतात ते माझ्या आजोबांचं नाव घेऊ शकत नाहीत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याची त्यांची पात्रता नाही.

संजय राऊत आज एक मोठा मोर्चा लढत आहेत ते स्वतः जेलमध्ये गेले याच्या सारखं त्यांनी केलं नाही. आज देखील संजय राऊत उद्धव ठाकरें बरोबर निष्ठावंत म्हणून राहिले आहेत. उद्योगपतींना दिल्लीतून फोन येतात हे खरं आहे अजित पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही. दिल्लीतून फोन आल्यानंतर सर्व उद्योगपतींना दबावाने गुजरातला जावं लागलं हे खर आहे. या सरकारच्या काळामध्ये राज्यात एक तरी नवा उद्योग आला आहे का? देणंघेणं वाटाघाटी यामध्येच हे सरकार व्यस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Travel : किल्ल्यांचे विहंगम दृश्य अन् आव्हानात्मक ट्रेक, नाशिकमध्ये लपलंय 'हे' सुंदर ऐतिहासिक ठिकाण

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Municipal Elections : निवडणुका लागताच महायुतीत मिठाचा खडा, अजित पवार स्वबळावर लढणार, ठाण्यात रंगत वाढली

Bigg Boss Marathi 6 : अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं 'बिग बॉस मराठी'शी खास नातं, कोकण हार्टेड गर्लनं VIDEO शेअर करत केला खुलासा

Accident: आनंदावर विरजन! लग्नाला जाताना समृद्धी महामार्गावर कार उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,अपघातापूर्वीचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT