Zeeka Virus Symptoms and Treatment  Saam TV
लाईफस्टाईल

Zika Virus Symptoms, Treatment: जीवघेणा झिका व्हायरस आहे तरी काय? वाचा लक्षणे आणि उपाय

Zika Virus Symptoms and Treatment Details in Marathi: चिंताजनक बाब म्हणजे पुण्यातही झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

कर्नाटकमध्ये झिका व्हायरसचा शिरकाव झाला आहे. येथे एका ५ वर्षांच्या मुलगी पॉझिटीव्ह आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालीये. अशात राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच झिका व्हायरसशी दोन हात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे पुण्यातही याचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

झिका व्हायरस काय आहे? तो कसा होते? त्याची लक्षणे काय? तसेच या व्हायरसचा आतापर्यंतचा इतिहास काय आहे? याची सर्वच माहिती जाणून घेणार आहोत.

लक्षणे

झिका व्हायरसमुळे त्या व्यक्तीला डोकेदुखीची लक्षणे जाणवतात. तसेच शरीरातील स्नायू जड होतात. स्नायू दुखू लागतात. त्यासह शरीरावर बारीक पुरळ उठण्यास सुरूवात होते. तसेच हिरड्या सुद्धा दुखू लगतात.

उपाय काय?

झिका व्हायरस मच्छरांमुळे होतो. जर तुमच्या घरात जास्त मच्छर येत असतील तर आजपासून त्यावर उपाय शोधा. त्यासाठी झोपताना मच्छरदानीचा वापर करा. घराच्या आजुबाजूला स्वच्छता ठेवा. टॉयलेट सीट नेहमी झाकून ठेवा, तसेच दरवाजे बंद ठेवा. शौच्छासाठी अस्वच्छ वॉशरूम वापरू नका. व्हायरस झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका.

जर तुम्हाला या व्हायरसची लागण झाली तर काय करावे?

झिका व्हायरस आपल्या शरीरात किमान आठवडाभर राहतो. त्यामुळे तुम्हाला याचे कोणतेही एक लक्षण जरी जाणवले तरी लगेचच ब्लड आणि युरीन टेस्ट करा आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. गर्भवती महिलंनी अशावेळी आणखी जास्त काळजी घेणे गरजेचे असते. या काळात जास्त प्रमाणात पाणी, ज्यूस आणि कॉफी अशा पेयाचे सेवन करावे.

पहिल्यांदा हा व्हायरस कुठे सापडला?

झिका व्हायरस सर्वात आधी अफ्रीका देशातील युगांडाच्या जंगलात सापडला. एप्रिल १९४७ मध्ये येथील माकडांच्या एका प्रजातीत हा व्हायरस आला होता. त्यानंतर भारतात २०१७ मध्ये गुजरातच्या ३ व्यक्तींना याची लागण झाली. तर २०१८ मध्ये तामिळनाडूत काही व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

SCROLL FOR NEXT